Featured

जळगाव तहसीलदार सक्तीच्या रजेवर

Rajendra Patil

जळगाव –
येथील तहसीलदार वैशाली हिंगे यांना प्रशासनाकडून सक्तीच्या रजेवर पाठविण्यात आले आहे. त्यांच्या जागी श्वेता संचेती यांची नियुक्ती करण्यात आली आहे, अशी माहिती जिल्हा प्रशासनाने दिली.

कर्मचारी वर्गावर दबाव आणणे प्रशासकीय कामात दिरंगाई, विविध शासकीय योजनांच्या अंमलबजावणीसह शेतकऱ्यांच्या दुष्काळ व अतिवृष्टी मदत निधीच्या वाटपात अनियमितता आदी तक्रारी स्थानिक स्तरावरून जिल्हाधिकारी कार्यालयाकडे करण्यात आल्या होत्या.

याची दखल जिल्हाधीकारी यांनी घेउन प्रांताधिकारी यांना चौकशीचे आदेश दिले होते अहवाल प्राप्त झाल्यानंतर जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांनी जळगाव तहसीलदार वैशाली हिंगे यांना सक्तीच्या रजेवर पाठविण्याची कारवाई केली असल्याचे जिल्हाप्रशासनाने म्हटले आहे.

यासंदर्भात जळगाव तहसीलदार वैशाली हिंगे यांचा रजेचा अर्ज पंधरा दिवसां पूर्वीच प्राप्त झालेला होता. अशी माहिती दीपमाला चौरे, उपविभागीय अधिकारी जळगाव यांनी दिली.

Deshdoot
www.deshdoot.com