चोपडा : एस.टी.आगारतून माल वाहतुकीस प्रारंभ
Featured

चोपडा : एस.टी.आगारतून माल वाहतुकीस प्रारंभ

Rajendra Patil

चोपडा । प्रतिनिधी

तीन महिन्यापासुन कोरोना व्हायरस आजाराने थैमान घातले असून संपुर्ण देश लॉकडाऊन करण्यात आला आहे. यात वाहतुकीवर देखील बंदी घातली असल्याने शेतकरी सह व्यापारींचा माल पडुन राहत असल्याने माल खराब होवून नुकसानीचा सामना करावा लागत आहे.

शेतकरी व व्यापारींचे नुकसान होवू नये म्हणून शासन व राज्य परिवहन महामंडळाने एस.टी.ची माल वाहतूक सेवा सुरु करण्यात आली आहे. याच अनुषंगाने दि. 5 जून रोजी चोपडा आगारातील माल वाहतुकीचा शुभारंभ बाजार समितीचे सभापती नारायण पाटील, उपसभापती नंदकिशोर पाटील यांच्याहस्ते बाजार समितीत करण्यात आला.

यावेळी चोपडा बाजार समितीतील अमृतलाल सोहनराज जैन यांच्या कडून 8 टन भुसार (अनाज) माल न्यू प्रविण प्रोव्हीजन पंकजकुमारजी मुकुंदवाडी औरंगाबाद यांच्या कडे रवाना करण्यात आले.

यावेळी बाजार समिती संचालक कांतीलाल पाटील, भरत पाटील, मगन सर बाविस्कर, विठ्ठल पाटील, आगार प्रमुख संदेश क्षीरसागर, अनिल बाविस्कर, डि.डि.चावरे, ए.टी.पवार, व्यापारी धिरज सुराणा, पवन अग्रवाल, अजितकुमार सुराणा, राजुशेठ छाजेड, अजय अग्रवाल, पुरुषोत्तम अग्रवाल, बबलुभाई, गोटुभाई, जतनशेठ सुराणा, बाजार समितीचे सचिव निळकंठ सोनवणे, जितेंद्र देशमुख, एस.टी.कर्मचारी अशोक बाविस्कर ए आर शिरसाठ, शाम धामोळे, भगवान नायदे सह व्यापारी, हमालमापाडी उपस्थित होते.

Deshdoot
www.deshdoot.com