रावेर : मास्क न बांधल्याच्या कारणावरून फळ विक्रेत्याने प्रांताधिकारी यांच्याशी घातली हुज्जत ; गुन्हा दाखल
Featured

रावेर : मास्क न बांधल्याच्या कारणावरून फळ विक्रेत्याने प्रांताधिकारी यांच्याशी घातली हुज्जत ; गुन्हा दाखल

Rajendra Patil

रावेर | प्रतिनिधी

शहरातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौकात फळ विक्रेत्याजवळ ग्राहकांची गर्दी असल्याने प्रांत अधिकारी गर्दी पांगवत असतांना, सोशल डिस्टनसिंग पाळण्याच्या व मास्क बांधण्याच्या कारणाहून काही जणांनी हुज्जत घातल्याने रावेर पोलिसात शासकीय कामात अडथळा आणि रोगराई आपत्ती व्यवस्थापन कायदा मोडल्याच्या कारणाने तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौकात फळ विक्रेत्याकडे गर्दी जमा झाल्याचे पाहून, तहसील कार्यालयाकडे येणाऱ्या प्रांत अधिकारी डॉ.अजित थोरबोले यांच्या नजरेत पडल्यावर गर्दी हटवत असताना तसेच मास्क न बांधलेल्या लोकांशी बोलतांना काही जणांना राग आल्याने त्यांनी प्रांतअधिकारी व चालक यांना घेराव घालून शिवीगाळ केल्याने रावेर पोलिसात प्रांत अधिकरी यांच्या वाहनावरील चालक उमेश सोनार यांच्या फिर्यादीवरून मस्जिद मलक, मुश्ताक मलक, सादिक मलक यांच्यावर शासकीय कामात अडथळा आणून, आपत्ती व्यवस्थापन कायदा मोडल्याचे कलमे लावून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Deshdoot
www.deshdoot.com