जळगाव जिल्ह्यातील दोन पोलीस कर्मचारी मालेगावात करोना पॉझिटिव्ह
Featured

जळगाव जिल्ह्यातील दोन पोलीस कर्मचारी मालेगावात करोना पॉझिटिव्ह

Rajendra Patil

जळगाव | प्रतिनिधी

जिल्ह्यातील दोन पोलीस कर्मचारी मालेगावात कोरोना पॉझिटिव्ह आढळले. यातील एक जण यावल पोलीस ठाण्यात, तर दुसरा पोलीस कर्मचारी मालेगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात कार्यरत आहे. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

पहिला पॉझिटिव्ह पोलीस कर्मचारी मालेगावाला बंदोबस्तासाठी गेला असता त्याला बाधा झाली. तो कानळदा (ता.जळगाव) येथील मूळ रहिवासी आहे. दुसरा पोलीस कर्मचारी नालबंदी (ता.भडगाव) येथील मूळ रहिवासी आहे. तर त्याची सासरवाडी जोगलखेडा (ता.पारोळा) येथील आहे.

त्याच्या पत्नीला घेण्यासाठी तो २४ एप्रिल रोजी जोगलखेडा येथे आला होता. त्यावेळी त्यास काही नातेवाईकांनी चहा घेण्यासाठी बोलावले होते. त्यावेळी संपर्कात आलेल्या २० नातेवाईकांना जळगावात तपासणीसाठी आणण्यात आले आहे.

तर या पोलीस कर्मचार्‍याच्या संपर्कात आलेल्या ३४ जणांना होम क्वॉरंटाइन करण्यात आले आहे. या संशयितांचा परिसर पोलिसांनी सील केला आहे.

Deshdoot
www.deshdoot.com