Featured
जळगाव : पो.नि.रणजित शिरसाठ सेवेतून बडतर्फ ; महासंचालकांचे आदेश
जळगाव – प्रतिनिधी
आर.के.वाइन्स मद्य तस्करी प्रकरणात थेट सहभाग असल्याचे चौकशीत निष्पन्न झालेल्या तीन पोलीस कर्मचाऱ्यांना मंगळवारी जिल्हा पोलीस अधीक्षकांनी बडतर्फ केलेले आहे.
तसेच एमआयडीसी पोलीस ठाण्याचे निरीक्षक रणजित शिरसाठांच्याही बडतर्फ बाबतचा प्रस्ताव पोलीस महासंचालकांकडे रवाना केला होता. पोलीस महासंचालकांच्या स्वाक्षरीचे आदेश मंगळवारी रात्री उशिरा प्राप्त झाले.
त्यानुसार शिरसाठ यांच्यावरही सेवेतून बडतर्फची कारवाई करण्यात आली आहे.
28 रोजी रात्री उशिरा पोलीस निरीक्षक रणजित शिरसाठ यांना शासकीय सेवेतून बडतर्फ केल्याबाबत पोलीस महासंचाकांचे आदेश पोलीस महासंचालक प्राप्त झाले.
त्यानुसार 29 रोजी सकाळी शिरसाठ यांना त्यांच्या घरी जावून हे आदेश बजावण्यात आले. आदेश बजावल्यापासून शिरसाठ यांना शासकीय सेवेतून बडतर्फ करण्यात आले आहे.