पोलीस कर्मचाऱ्याचा तरूणीवर अत्याचार ; लोणवाडी येथील घटना
Featured

पोलीस कर्मचाऱ्याचा तरूणीवर अत्याचार ; लोणवाडी येथील घटना

Rajendra Patil

जळगाव – प्रतिनिधी

पोलीस विभागात नोकरीं करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याने तरूणीवर अत्याचार केल्याची संतापजनक घटना जळगाव तालुक्यातील लोणवाडी येथे घडली.

आरोपी पोलीस कर्मचारी जळगाव तालुक्यातील लोणवाडी येथील रहिवासी असून सध्या त्याची पहूर पोलीस ठाण्यात बदली झाली आहे. मात्र तो अद्याप हजर झालेला नाही असे सांगण्यात आले आहे.

रविवारी रात्री उशिरा या पोलीस आरोपी विरोधात पीडित तरूणीच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर पीडित तरूणीचे लग्न होऊन आठ दिवस झाले आहे. गर्भवती पत्नी असल्याचे नव-याला समजल्या नंतर पीडित तरूणीने पती सोबत जाऊन ‘त्या’ पोलीस कर्मचाऱ्या विरूध्द फिर्याद दिली. काल रात्री उशिरापर्यंत जळगाव एमआयडीसी पोलीस स्टेशनमध्ये बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे.

सदर पोलीस फरार असुन त्याचा शोध घेण्यासाठी एमआयडीसी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विनायकराव लोकरे डीबी पथकसह, पोलीस शोध घेत आहेत.

Deshdoot
www.deshdoot.com