Thursday, April 25, 2024
Homeजळगावजळगाव : रेड झोन वगळता इतर ठिकाणी दैनंदिन व्यवहार करण्यास परवानगी

जळगाव : रेड झोन वगळता इतर ठिकाणी दैनंदिन व्यवहार करण्यास परवानगी

नव्याने 10 आयसीयु बेडची व्यवस्था – पालकमंत्री गुलाबराव पाटील यांची पत्रकार परिषदेत माहिती

जळगाव ।

- Advertisement -

जिल्ह्यात 351 कोरोना पॉझिटीव्ह आढळून आले आहेत. तर आतापर्यंत 110 जणांना कोरोनामुक्त करून घरी पाठविण्यात आले आहे. मात्र, 39 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. 160 ऑक्सीजन बेड आहेत. तर नव्याने 10 आयसीयु बेडची व्यवस्था करण्यात आली आहे.

भुसावळतील ट्रामासेंटरच्या इमारतीचे काम पुर्ण झाले असून येत्या दोन दिवसात ते कार्यान्वित होणार आहे. जिल्ह्यातील रेड झोनचे तालुके वगळता इतर भागात दैनंदिन व्यवहार सोशल डिस्टन्सिंगचे पालन करीत पूर्ववत सुरू करण्याची परवानगी दिली आहे. त्यात राज्याच्या धर्तीवर पूर्वीप्रमाणे जीवनाश्यक वस्तूचे व्यवहार सुरु राहील.

नवीन कोणताही बदल करण्यात आलेला नाही. आरोग्याच्या दृष्टीकोनातून व्यावसायिकांनी दुकानची साफसफाई करुन घ्यावी. मात्र, त्यांना वस्तूंची खरेदी-विक्री करता येणार नाही.काही अंशत: शिथिलता दिली जात असली तरी नागरिकांनी गर्दी न करता शासनाच्या नियमांचे पालन करणे गरजेचे आहे, अशी माहिती जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत दिली.

जिल्ह्यात उद्या लॉकडाऊनचे नियम शिथील करण्यात येणार आहे. त्यामुळे नागरिकांनी विनाकारण बाहेर पडू नये, असे आवाहन पालकमंत्री ना. पाटील यांनी केली आहे. दरम्यान, आपत्ती काळात शासकीय वैद्यकिय अधिकारी गैरहजर राहत असल्याची तक्रार येत असतील तर त्यांच्यावर कारवाई करण्याच्या सुचना देण्यात येणार आहे.

10 ते 5 वाजेपर्यंत ऑनलाईन दारु विक्री
रेडझोन व नॉनरेडझोन असे विभाग करण्यात आलेले आहेत. जळगाव मनपा रेडझोनमध्ये असून जळगाव शहरातील रेडझोन वगळता इतर भागात नवीन स्टॉक न मागवता आहे त्या स्टॉकमध्ये सकाळी 10 ते 5 वाजेपर्यंत दारूची ऑनलाईन घरपोच सेवा देण्यात येणार आहे.

आपत्ती काळात गैरहजर डॉक्टरांवर कारवाई होणार
कोरोनाच्या आपत्ती काळात शासकीय वैद्यकीय अधिकारी गैरहजर राहत असल्याची तक्रार आहेत.असा प्रश्न उपस्थित केला असता कोरोना आपत्तीदरम्यान, वैद्यकीय सेवा देण्यासाठी डॉक्टर्स व कर्मचारी प्रयत्नशील आहेत. जर कोणी वैद्यकीय अधिकारी गैरहजर राहत असतील तर त्यांच्यावर कारवाई करण्याच्या सूचना देण्यात येईल, असेही ना.पाटील यांनी यावेळी सांगितले.

- Advertisment -

ताज्या बातम्या