जळगाव : गटविकास अधिकार्‍यांनी घेतली होम क्वॉरंटाईन नागरीकांची माहिती
Featured

जळगाव : गटविकास अधिकार्‍यांनी घेतली होम क्वॉरंटाईन नागरीकांची माहिती

Rajendra Patil

तरसोद – जळगाव
जळगाव पंचायत समितीचे गटविकास अधिकारी शशिकांत सोनवणे, विस्तार अधिकारी श्री.मोतीराळे यांनी तरसोद गावात अचानक भेट देवून होम क्वॉरंटाईन केलेल्यांची माहिती घेवून त्यांची खात्री केली.

तसेच ग्रामस्तरीय कोरोना समिती करत असलेल्या कामाचे कौतुक करून अशाच उपाययोजना यापुढेही सुरु ठेवा अशी सूचना समितीला केली. यावेळी सरपंच सौ.मनिषा मनोज काळे, ग्रामसेवक नरेंद्र साळुंके, उपकेंद्राचे डॉ.तेजस्विनी देशमुख, डॉ.कोळी, डॉ.काशिद मॅडम, पो.पा.गोकुळ शिरूड, कोतवाल ज्ञानेश्वर कोळी, ग्रा.पं.कर्मचारी राहुल पाटील, आशा वर्कर आदी उपस्थित होते.

तरसोद गणपती मंदिर संस्थानतर्फे मास्क वाटप

येथील जागृत देवस्थान असलेल्या श्री गणपती मंदिर संस्थान तर्फे तरसोद गावातील प्रत्येक कुटूंबातील सदस्यांना मास्क वाटप करण्यात आले. संस्थान तर्फे देण्यात आलेले मास्क ग्रामपंचायत कार्यालयात मंदिर संस्थानचे अध्यक्ष चंद्रकांत अत्तरदे यांनी सरपंच सौ.मनिषा काळे यांना प्रतिनिधीक स्वरूपात मास्क देवून ते संपूर्ण मास्क ग्रामस्थांना वाटप करण्यासाठी ग्रामपंचायतीकडे सोपविण्यात आले.

गणपती मंदिर संस्थानने दिलेले मास्क गावातील सर्व ग्रामस्थांना देण्याची व्यवस्था करून आरोग्य सेविका डॉ.काशिद मॅडम व अंगणवाडी सेवीका, आशा वर्कर यांनी वाटप करण्याची जाबाबदारी स्विकारली. हे कार्य करत असताना ग्रामस्थांना कोरोना या संसर्गजन्य आजाराविषयी माहिती देवून व मास्क लावण्याबाबत जनजागृती करून मंदिर संस्थानने दिलेल्या मास्कचा सदुपयोग करावा अशा सुचना देण्यात येत आहे.

ग्रा.पं.कार्यालयात मास्कचे वाटप करताना मंदिर संस्थानचे पदाधिकारी भगवान देवरे, नंदलाल पाटील, पंकज पाटील, जयवंत पाटील, सुधाकर सोनवणे, अशोक राजपूत, ग्रामसेवक नरेंद्र साळुंके, तलाठी रूपेश ठाकूर, पोलीस पाटील गोकुळ शिरूड, आरोग्य सेविका डॉ.काशिद मॅडम, मनोज काळे, ग्रा.पं.कर्मचारी, अंगणवाडी सेविका, मदतनिस, आशा वर्कर व ग्रामस्थ उपस्थित होते.

Deshdoot
www.deshdoot.com