Saturday, April 27, 2024
Homeजळगावजळगाव : गुरांची बेकायदेशीरपणे वाहतूक ; तिघांवर गुन्हा दाखल

जळगाव : गुरांची बेकायदेशीरपणे वाहतूक ; तिघांवर गुन्हा दाखल

जळगाव | प्रतिनिधी
मालवाहू वाहनात गाय, वासरू आणि गोर्‍हांची बेकायदेशीरपणे वाहतूक करणार्‍या तिघांवर शहर पोलिस ठाण्यात मध्यरात्री गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

शहरातील राजेंद्र देविदास नन्नवरे व योगेश भिकन पगारे हे गुरुवारी रात्री ११ वाजता जेवण झाल्यानंतर शतपावली करीत असताना शिवाजीनगर स्मशानभूमीजवळ चारचाकी मालवाहू वाहन क्रमांक (एमएच १९ बीएम ८१८८) या वाहनातून गाय, वासरू आणि गोर्‍ह्यांची वाहतूक करतांना गुरांचा हंबरडा फोडण्याचा आवाज आला.

- Advertisement -

या वाहनाला थांबवून चालकाची चौकशी केली असता त्याच्याकडे बेकायदेशीर गुरे व वाहनात निर्दयीपणे कोंबून भरलेली होती. त्यांनी हे वाहन शहर पोलीस ठाण्यात आणण्यात आले.

या प्रकरणी वाहन व गुरांना ताब्यात घेतले असून त्याची किंमत १ लाख ८३ हजार रुपये इतकी आहे. या प्रकरणी राजेंद्र नन्नवरे यांच्या फिर्यादीवरुन गुरांची निर्दयीपणे वाहतूक करणारा चालक नदीमखान समदखान (२२, रा.हुडको,शिवाजीनगर) व त्याचा साथीदार समशेरखान धासीखान (४०, रा.सीटी कॉलनी,गेंदालाल मील) व प्रफुल्ल संभाजी शिंदे (३४, रा.शांती नगर) या तिघांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या