जळगाव : जिल्ह्यात ४४ करोना बाधित रूग्ण आढळले ; बाधित रूग्णांची संख्या झाली १००१
Featured

जळगाव : जिल्ह्यात ४४ करोना बाधित रूग्ण आढळले ; बाधित रूग्णांची संख्या झाली १००१

Rajendra Patil

जळगाव –
जिल्ह्यात करोना बाधित रूग्णांच्या संख्येने हजाराचा आकडा पार केला असून आज पुन्हा करोना बाधित ४४ रुग्ण आढळले आहेत.

यात जळगाव शहर ५, भुसावळ ५, अमळनेर १०, चोपडा ९, धरणगाव ४, एरंडोल १, जामनेर २, रावेर ६, चाळीसगाव २ या रुग्णांचा समावेश आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत एकूण १००१ रुग्ण आढळले आहेत.

Deshdoot
www.deshdoot.com