जळगाव : शहरात पुन्हा दोन करोना बाधित रूग्ण आढळले ; करोना बाधित रूग्णांची संख्या २३७
Featured

जळगाव : शहरात पुन्हा दोन करोना बाधित रूग्ण आढळले ; करोना बाधित रूग्णांची संख्या २३७

Rajendra Patil

जळगाव –

काही वेळापुर्वीच प्रशासनाने भुसावळ येथील स्लॅब घेतलेल्या ६५ संशयित व्यक्तींचे नमुने तपासणी अहवाल निगेटिव्ह आले असल्याची आनंद वार्ता दिली.

तेवढ्यातच आता जळगाव शहरात पुन्हा दोन करोना बाधित रूग्ण आढळले असल्याचे वृत्त प्रशासनाकडून प्राप्त झाल्याने जळगाव शहरवासियांच्या चिंतेत भर पडली.

करोना बाधित सापडलेल्या रूग्णांमध्ये जोशी पेठेतील महिला व जिल्हा पेठेतील पुरूषाचा समावेश आहे. आता जिल्ह्यातील करोना बाधित रूग्णांची संख्या २३७ झाली आहे.

जिल्ह्यात करोना बाधित रूग्णांची वाढती संख्या बघता जिल्हावासियांनी घाबरून न जाता जागरुक रहावे. लॉकडाऊनचे पालन करावे. शक्यतो घराबाहेर पडू नये. अत्यंत आवश्यकता असेल तर घराबाहेर पडताना मास्कचा वापर करावा. जीवनावश्यक वस्तुंची खरेदी करतांना सोशल डिस्टनिंगचे पालन करावे. दिवसातून चार/पाच वेळा हात साबणाने स्वच्छ धुवावे. कोरोना सदृश्य लक्षणे आढळून आल्यास त्वरीत तपासणी करुन घ्यावी. असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांनी केले आहे.

Deshdoot
www.deshdoot.com