जळगाव : कोरोना पॉझिटीव्ह रुग्णाच्या संपर्कातील १५ व अन्य चौघांचे नमुने तपासणी
Featured

जळगाव : कोरोना पॉझिटीव्ह रुग्णाच्या संपर्कातील १५ व अन्य चौघांचे नमुने तपासणी

Rajendra Patil

जळगाव | प्रतिनिधी

कोरोनाच्या दुसर्‍या रुग्णाचा अहवाल पॉझिटीव्ह आल्यामुळे त्याच्या कुटंबीयांसह संपर्कातील संशयित १५ आणि अन्य चार अशा एकूण १९ संशयितांच्या लाळीचे नमुने घेवून ते धुळ्यातील प्रयोगशाळेत तपासण्यासाठी पाठवण्यात आले आहे. या संशयितांची ही स्थिती गुरुवारी दुपारी ३ वाजेपर्यंतची आहे.

या संशयितांचे नमुने घेतल्यानंतर त्यांना महापालिकेच्या छत्रपती शाहू महाराज रुग्णालयातील कोरोना नियंत्रण कक्षात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, जिल्हा रुग्णालयात या अगोदर एक आणि त्यानंतर नवीन एक अशा दोन पॉझिटीव्ह रुग्णांवर उपचार सुरू आहे.

पहिल्या रुग्णाची प्रकृती स्थिर आहे. तर दुसर्‍या पॉझिटीव्ह रुग्णाला श्‍वास घेण्यास अधिक त्रास होत आहे. त्याच्या राहत्या घराच्या भागात महापालिकेच्या आरोग्य विभागामार्फत साफसफाई, फवारणी, आरोग्य सर्वेक्षण आदी सुरू आहे. तसेच या भागात संचारबंदीच्या दृष्टीने कडक अंमलबजावणी सुरू आहे. विविध ठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त आहे. रस्त्यावर विनाकारण फिरणार्‍यांना पोलीस पकडून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करीत आहेत.

Deshdoot
www.deshdoot.com