जळगाव : जिल्ह्यात करोना बाधित ५५ रुग्ण आढळले
Featured

जळगाव : जिल्ह्यात करोना बाधित ५५ रुग्ण आढळले

Rajendra Patil

जळगाव –

जिल्ह्यात शनिवारी सायंकाळपर्यंत कोरोना बाधित ५५ रुग्ण आढळले. यात सुरुवातीला भुसावळमधील १४ रुग्ण पॉझिटिव्ह आढळले.

तर ५३ अहवाल निगेटिव्ह आले. नंतरच्या टप्प्यात २०३ अहवाल जाहीर झाले. यात ४१ रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. तर १६२ अहवाल निगेटिव्ह आले आहेत.

यातील पॉझिटिव्ह अहवालात भडगाव पाच, जळगाव ग्रामीण भाग दोन, चोपडा सहा, एरंडोल तीन, अमळनेर ११, यावल चार, रावेर आठ व जामनेरमधील एका रुग्णाचा समावेश आहे. जिल्ह्यात आतापर्यंत ६७६ पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत.

Deshdoot
www.deshdoot.com