सुखदवार्ता : चाळीसगावात दोन रुग्ण करोनामुक्त
Featured

सुखदवार्ता : चाळीसगावात दोन रुग्ण करोनामुक्त

Rajendra Patil

चाळीसगाव | प्रतिनिधी

चाळीसगाव शहरातील कोविड केअर सेंटर मधून दोन रुग्ण करोनामुक्त झाले आहेत.
शहारातील चौधरी वाडा येथील कंपाऊडर व बोरकुंड ता.धुळे येथील दोघांना आज कोविड केअर सेंटर मधून घरी सोडण्यात सोडण्यात आल्याची माहिती वैद्यकीय अधीक्षक डॉ.बी.पी.बाविस्कर यांनी दिली आहे.

या दोघांवर शहरातील यशस्वी उपचार करण्यात आल्यामुळे ते कोरोनामुक्त झाल्याचे भावान दोघांनी व्यक्त केल्यात. तसेच डॉक्टर व प्रशासनाचे विशेष आभार मानले.

याप्रसंगी प्रातांधिकारी लक्ष्मीकांत सातळकर, तहसीलदार अमोल मोरे, वैद्यकिय आधिकारी डॉ.बी.पी.बाविस्कर, डॉ.डी.के.लांडे आदि उपस्थिती होते.

Deshdoot
www.deshdoot.com