जळगाव बाजार समितीतर्फे कोरोनाग्रस्तांसाठी पाच लाखांची मदत
Featured

जळगाव बाजार समितीतर्फे कोरोनाग्रस्तांसाठी पाच लाखांची मदत

Rajendra Patil

जमेल ती मदत करण्याचे ना.गुलाबराव पाटील यांचे आवाहन

जळगाव –

राज्यातील कोरोनाग्रस्तांसाठी महाराष्ट्र मुख्यमंत्री मदत निधीमध्ये येथील जळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने ५ लाख लाखांची मदत जाहीर केली. आज पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्याकडे धनादेश सुपूर्त करण्यात आला.*

प्रत्येकाने आपल्या आर्थिक कुवतीनुसार कोरोनाग्रस्तांसाठी जमेल तशी मदत करून खारीचा वाटा उचलावा असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत येथील जळगावातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने राज्यातील कोरोनाग्रस्तांसाठी ५ लाखांची आर्थिक मदत जाहीर केले. कृउबा सभापती कैलास चौधरी व संचालक मंडळ यांनी पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्याकडे मुख्यमंत्री सहाय्यता निधीला ५ लाख रुपयांचा धनादेश नुकताच सुपूर्द केला.

शहरातील कृषी उत्पन्न बाजार समितीने ५ लाखाचा निधी दिल्याने पालकमंत्री या नात्याने ना. गुलाबराव पाटील यांनी आभार मानले आणि दानशुर व्यक्ती व संस्थांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधीला जमेल ती मदत करावी असेही आवाहन पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी केले आहे.

यावेळी कृ.उ.बा. समितीचे सभापती कैलास चौधरी, उपसभापती सुरेश पाटील, संचालक पंकज पाटील, भरत बोरसे, अनिल भोळे, वसंत भालेराव, मनोहर पाटील, प्रविण भंगाळे, संतोष नारखेडे, मुरलीधर पाटील, मच्छींद्र पाटील, प्रशांत पाटील, नवलसिंगराजे पाटील आदी उपस्थित होते.

Deshdoot
www.deshdoot.com