जळगाव : रायसोनी कॉलेजजवळ अपघात ; तीन जण जखमी ; दोन गंभीर
Featured

जळगाव : रायसोनी कॉलेजजवळ अपघात ; तीन जण जखमी ; दोन गंभीर

Rajendra Patil

जळगाव –
तालुक्यातील शिरसोली येथील बांधकाम कारागीर मोटारसायकलने जात असताना समोरून येणाऱ्या ओमनी कारने जोरदार धडक दिल्याने या अपघातात तीन जणन जखमी झाले असून दोन जण गंभीर जखमी आहेत. हि घटना आज सकाळी ७.३० च्या दरम्यान शिरसोली रोडवरील रायसोनी कॉलेज जवळ घडली.

शिरसोली प्र.न. येथील राहुल शांताराम पाटील (वय २५), भुषण शाम मिस्तरी (वय २४), सागर नाना पाटील (वय २५) हे तीघ शिरसोली येथून जळगावकडे कामानिमित्त मो.सा.क्र. एम.एच. १९- डी.के. ९८९० ने येत होते.

समोर येणाऱ्या ओमनी कार क्र.एम.एच.१९ सी.एफ.३७५४ ने रायसोनी कॉलेज जवळील चढतीवर जोरदार धडक दिल्याने दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. जखींना मेडिकल कॉलेज येथे पाठविण्यात आले असून दोघं जखमींची तब्बेत चिंताजनक आहे. तपास एम.आय.डी.सी.पोलीस करत आहेत.

Deshdoot
www.deshdoot.com