Thursday, April 25, 2024
Homeधुळेसाक्री : विहिरीत पडल्याने बहिण-भाचीचा मृत्यू

साक्री : विहिरीत पडल्याने बहिण-भाचीचा मृत्यू

  1. धुळे | प्रतिनिधी

साक्री  तालुक्यातील लघडवाड येथे चिंचेच्या झाडाखाली खेळत असतांना विहिरीत पाय घसरून पडल्याने बहिण-भाची यांचा मृत्यू झाला. याबाबत साक्री पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. साक्री तालुक्यातील लघडवाड येथे राहणारे तुकाराम अमृत गांगुर्डे यांच्या मालकीचे शेत आहे.

शेतातील विहिरजवळील चिंचेच्या झाडाच्या सावलीत दि. २२ मे रोजी दुपारी जिजाबाई गुजर पवार (वय १९) आणि रोशनी पिंटू गावीत (वय १३) हे बहिण व भाची खेळत असतांना त्या दोघाचा पाय घसरला. व दोघे विहिरीत पडल्याने पाण्यात बुडून बहिण-भाजीचा मृत्यू झाला. काही वेळानंतर तुकाराम गांगुर्डे शेतात बैलांना पाणी पाजण्यासाठी गेले असता त्यांना विहिरीत काही तरी  तरंगतांना दिसले. याबाबत साक्री पोलिस ठाण्यात माहिती देण्यात आली.

- Advertisement -

विहिरीत पट्टयाच्या पोहणार्‍यांनी शोध घेतला असता जिजाबाई पवार आणि रोशनी गावीत या दोघींना विहिरीतून बाहेर काढून साक्री ग्रामीण रूग्णालयात दाखल केले असता तेथे डॉक्टरांनी तपासणी करून दोघींना मृत घोषित केले. याबाबत साक्री पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या