धुळे : नागरिकांच्या रोषापुढे मनपाने घेतले नमते  ; करोना बाधीत व्यक्तीचे प्रेत न जाळताच नेले परत
Featured

धुळे : नागरिकांच्या रोषापुढे मनपाने घेतले नमते ; करोना बाधीत व्यक्तीचे प्रेत न जाळताच नेले परत

Rajendra Patil

धुळे – प्रतिनिधी

करोनामुळे मृत्यू झालेल्या व्यक्तीवर अंत्यसंस्कार करण्यास स्थानिक नागरिकांनी जोरदार विरोध केल्यामुळे अखेर मनपाला नमते घ्यावे लागले. त्यामुळे देवपूरातील अमरधाम मधून प्रेत परत घेऊन जाण्याची नामुस्की मनपा यंत्रणेवर आली.

येथील भाऊसाहेब हिरे वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयात काल रात्री 11.45 वाजता एका 75 वर्षाच्या व्यक्तीचा कोरोनामुळे मृत्यू झाला. यानंतर मनपा यंत्रणेने लगेचच त्यावर अंतिम संस्कार करण्यासाठी प्रेत देवपुरातील अमरधाम मध्ये आणले. याची परिसरातील रहिवाशांना कुणकुण लागताच त्यांनी एकत्र येऊन प्रेत जळण्यास कडाडून विरोध केला.

याठिकाणी दाट लोकवस्ती असल्याने जीवितास धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे कोरोना बधितांसाठी अंत्यसंस्कारांची वेगळी व्यवस्था करावी, अशी नागरिकांची मागणी आहे. नागरिकांचा रोष वाढत असल्याचे बघून पोलिसांना पाचारण करण्यात आले. मात्र नागरिक ऐकण्यास तयार नसल्याने अखेर मनपाला नमते घ्यावे लागले.

चार दिवसांपूर्वी शहरातील एका प्रतिष्ठित व्यक्तीच्या भावाचा कोरोनाने मृत्यू झाल्यानंतर त्यावर याच देवपूर अमरधाम मध्ये अंत्य संस्कार करण्यात आले. मात्र प्रेत अर्धवट जळालेले सोडून यंत्रणा पसार झाल्याने दुसऱ्या दिवशी सकाळी नागरिकांनी हरकत घेतली. तक्रारीनंतर मनपा यंत्रणेने येऊन पुन्हा ते प्रेत जाळले. याबाबतची तक्रार ताजी असताना काल रात्री परत हेच घडल्याने नागरिक संतप्त झाले आहेत.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com