धुळे जिल्ह्यात 24 तासात 24 करोना पॉझिटिव्ह रूग्ण आढळले ; बाधितांची संख्या झाली १९९
Featured

धुळे जिल्ह्यात 24 तासात 24 करोना पॉझिटिव्ह रूग्ण आढळले ; बाधितांची संख्या झाली १९९

Rajendra Patil

लॉकडाऊन मधून सूट मिळताच बधितांच्या संख्येत वाढ

धुळे –
जिल्ह्यातील कोरोना संसर्ग होणाऱ्या रुग्णांमध्ये झपाट्याने वाढ होत असून अवघ्या चोवीस तासात 24 नवीन रुंग आढळून आले आहेत.

यामुळे एकूण बधितांची संख्या 199 इतकी झाली असून पुन्हा तिघांचा बळी गेल्याने आतापर्यंत 24 जणांचा मृत्यू झाला आहे.

काल रात्री पासून आढळून आलेल्या बधितांमध्ये धुळे शहरातील 15 तर शिरपूर मधील 9 रुग्णांचा समावेश आहे. या व्यतिरिक्त पारोळा मधील 2 रुग्ण धुळ्यात पॉझिटिव्ह आढळून आल्याने उपचार घेत आहेत.

तसेच या 24 तासात 3 रुग्णांचा मृत्यू झाल्याने एकूण मृतांची संख्या आता 24 झाली असून जिल्ह्यातील बधितांचा आड 199 वर पोहचला आहे. स्थानिक प्रशासनाने आजपासून दुकाने उघडण्यास परवानगी दिली आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com