धुळे : आज सकाळच्या अहवालात शहरात आढळले तीन पॉझिटिव्ह रूग्ण ; बाधित रूग्ण संख्या झाली १३७
Featured

धुळे : आज सकाळच्या अहवालात शहरात आढळले तीन पॉझिटिव्ह रूग्ण ; बाधित रूग्ण संख्या झाली १३७

Rajendra Patil

धुळे –

जिल्ह्यात कोरोना बाधितांची रुग्ण संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. आज देखील जिल्हा रुग्णालय येथील आलेल्या ६३ अहवालांपैकी तीन अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.

त्यात ४२ वर्षीय पुरुष, बडगुजर कॉलनी, ३५ वर्षीय पुरुष कैलास नगर व साक्री रोडवरील 29 वर्षीय महिलेचा समावेश आहे. जिल्ह्यातील कोरोना बाधितांची रुग्ण संख्या आता एकूण १३७ वर पोचली आहे.

यामध्ये धुळे शहर ९२, धुळे ग्रामीणमधील ४५ रुग्णांचा समावेश आहे. जिल्ह्यात कोरोनामुळे आतापर्यंत 16 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 66 जणांनी कोरोनावर मात केली आहे.

Deshdoot
www.deshdoot.com