Friday, April 26, 2024
Homeधुळेधुळे : बोरकुंड गावात शिरला बिबट्या ; १२ तासांपासून पकडण्याचे प्रयत्न...

धुळे : बोरकुंड गावात शिरला बिबट्या ; १२ तासांपासून पकडण्याचे प्रयत्न सुरूच

धुळे –

तालुक्यातील बोरकुंड गावातबपहाटे बिबट्या शिरला असून त्याला पकडण्यासाठी सायंकाळ पर्यंत वन विभागाच्या प्रयत्नांना यश आलेले नाही. पाण्याच्या शोधात हा बिबट्या गावात आला असावा, असा अंदाज आहे.

- Advertisement -

शेतकरी सकाळी नेहमीप्रमाणे कामासाठी शेतात जात असताना त्यांना रस्त्यात बिबट्याचे दर्शन झाले आणि त्यांनी घाबरून गावाकडे पळ ठोकला. पहाटे पहाटे हा बिबट्या आला असावा असे सांगितले जाते.

वन विभाग व पोलिसांना याची माहिती देण्यात आली. एक पाण्याआव्हा टाकीजवळून नंतर या बिबट्याने शेत शिवारातील घरांकडे आपला मोर्चा वळविला आहे. बिबट्या घुसल्याची वार्ता पंचक्रोशीत पसरल्याने त्याला पाहण्यासाठी माळरानावर गावकऱ्यांनी मोठी गर्दी केली आहे. गर्दी पांगविण्यासाठी पोलिसांनाही कसरत करावी लागते आहे.बोरकुंड गाव शेजारीच जुनवणे चे मोठे जंगल आहे.

जंगलातील पाणी संपल्याने आता पाण्यासाठी वन्य प्राणी गावाकडे धाव घेऊ लागले आहे. मात्र हे साधारणता 2 वर्ष वयाचे पिल्लू असून भरकटुन आल्याचे बोलले जाते. बऱ्याच उशिरा वन विभागाचे कर्मचारी गावात पोहचले, त्यांनी त्याला पकडण्या साठी पिंजरे लावले आहेत आरएफओ महेश पाटील, सह वनक्षेत्रपाल संजय पाटील, वनपाल सी आर अवरसरमल, डी के निकम,बाळू पाटील, व्ही.व्ही.जाधव, एन एम पठाण, चेतन काळे, ज्ञानेश्वर बागले, सुनील पाटील, यांच्यासह पोलीस उपनिरीक्षक भोरकडे, योगेश सोनार, सुनील ठाकूर, भूषण पाटील, नितीन धिवसे हे प्रयत्नशील आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या