Thursday, April 25, 2024
Homeजळगावचाळीसगाव : सायगाव येथील करोना पॉझिटिव्हच्या संपर्कातील ५० जण क्वाॅरंटाईन

चाळीसगाव : सायगाव येथील करोना पॉझिटिव्हच्या संपर्कातील ५० जण क्वाॅरंटाईन

रुग्णाच्या घरांचा परिसर कंटेन्मेंट झोन घोषीत, डोणच्या चौघांचे अहवाल निगेटिव्ह

चाळीसगाव | प्रतिनिधी

तालुक्यातील सायगाव येथील एक जण नांदगाव तालुक्यात रविवारी कोरोना पॉझिटिव्ह आढळुन आला. सोमवारी तालुका प्रशासाने कोरोना बाधिताच्या घराची पाहणी करुन, तो वास्तव्यास असलेला घराच्या आजुबाजूचा परिसर कंटेन्मेंट झोन म्हणून घोषीत केला.

- Advertisement -

कोरोनाग्रस्ताच्या संपर्कात आलेला लोकांचा शोध घेतला. यात त्यांच्या परिवारीतील पत्नी, तीन मुले, वडील, व त्यांच्या संपर्कात आलेल्या १८ जणांना चाळीसगाव येथील कोव्हीड केअर सेंन्टरमध्ये आनुन क्वारंटाईन करण्यात आले. तर या १८ जणांच्या संपर्कात आलेल्या ३० ते ३५ जणांना सायंगाव येथेच होम क्वारंटाईन करण्यात आले.

सायगाव येथून तब्बल ५० जणांचा क्वारंटाईन करण्यात आल्यामुळे एक खळबळ उडाली आहे. उद्या हायरिक्स मधील १८ जणांचे स्वॅब घेवून ते तपासणीसाठी पाठविण्यात येणार असल्याची माहिती वैद्यकिय आधिकार्‍यांनी दिली आहे. दरम्यान सायगाव येथील कोरोनाग्रस्तांची गणना नांदगाव तालुक्यात करण्यात येणार असल्याची माहिती प्राप्त झाली आहे.

डोणच्या चौघांचे अहवाल निगेटिव्ह
तालुक्यातील डोण येथील कोरोना संशयित ७० वर्षीय वृध्दाचा दि,२२ रोजी अचनाक मृत्यू झाला आहे. मयत वृद्धाला शहरातील कोव्हीड केअर सेंटरमध्ये क्वारंटाईन करण्यात होते. कोव्हीड सेंटरमध्येच या वृध्दाचा मृत्यू झाल्यामुळे तालुक्यात एकच खळबळ उडाली होती.

मयतासह शहारातील एक खाजगी डॉक्टर अशा सात जणांचे स्वॅब तपासणी धुळे येथे पाठविण्यात होत. त्यापैकी चार जणांचे अहवाल आज प्राप्त झाले असून त्याचें रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. तर उर्वरित तीन जणांचे अहवाल प्रलंबित आहेत. ते आज उशिरापर्यंत येण्याची शक्यता आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या