चाळीसगाव : डोण येथील दोन महिलांचा करोना अहवाल पॉझिटीव्ह
Featured

चाळीसगाव : डोण येथील दोन महिलांचा करोना अहवाल पॉझिटीव्ह

Rajendra Patil

चाळीसगाव | प्रतिनिधी

तालुक्यातील डोण येथे मागील महिन्यातच मयत वृध्दाचा अहवाल करोना पॉझिटिव्ह आला होता. तर मयत करोग्रस्त वृध्दाच्या परिसरातच वास्तव्यास असलेला ४० वर्षीय पुरुषास करोनाची बाधा झाल्याचे नुकतेच उघड झाले होते.

आता डोण येथील करोनाग्रस्ताच्या संपर्कात आलेल्या दोन महिला देखील करोना पॉझिटिव्ह असल्याची माहिती डॉ.डी.के.लांडे यांनी दिली आहे. त्यामुळे तालुक्यात पुन्हा एकच खळबळ उडाली आहे.

आज सकाळी चार जण करोनामुक्त झाले, परंतू काही तासातच दोन महिलांना करोनाची बाधा झाल्यामुळे तालुकावासियांची धाकधुक वाढली आहे.

डोण येथील करोना पॉझिटिव्ह रुग्णाच्या संपर्कातील पत्नी, मुले व इतर अशा सहा जणांचे स्वॅब घेवून ते तपासणीसाठी जळगाव येथे बुधवारी पाठविण्यात आले होते. त्यांचा अहवाल आज प्राप्त झाला असून दोन महिला करोना बाधीत झाल्याचे उघड झाले आहे.

येथे काही दिवसांपूर्वीच करोनाग्रस्त ७० वर्षीय वृध्दाचा २२ में रोजी अचनाक मृत्यू झाला होतो. त्यामुळे त्याच्या घराचा आजु-बाजूचा ५०० मिटरचा परिसर कटेन्मेंट झोन म्हणून घोषीत करण्यात आला होता. गेल्या चार ते पाच दिवसांपासून याच कटेन्मेंट झोन मधील एका तरुणाला ताप आल्याने, त्याने शहारातील एका खाजगी रुग्णालयात उपचार घेतला. परंतू ताप कमी न झाल्यामुळे त्याने येथील ग्रामीण रुग्णालयाशी संपर्क साधला असता, त्याला उपचारासाठी डॉक्टरांनी थेट जळगाव येथील शासकिय रुग्णालयात पाठविले.

त्याठिकाणी त्यांच्या स्वॅबची तपासणी केली असता, बुधवारी (दि,३) त्यांचा अहवाल करोना पॉझिटिव्ह आला. करोनाग्रस्ताच्या संपर्कात आलेल्या त्यांची पत्नी, एक महिला व चार मुले अशा सहा जणांना क्वारंटाईन करण्यात आले. त्यांचे स्वॅब घेवून ते जळगाव येथे तपासणी पाठविण्यात आले होते. त्याच्या तपासणीचा अहवाल आज (दि.६) प्राप्त झाले असून त्यापैकी दोन महिलांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत.

तर उर्वरित रिपोर्ट निगेटिव्ह आल्याची माहिती तालुका वैद्यकिय आधिकारी डॉ.डी.के.लांडे यांनी दिली. दरम्यान आज संकाळी शहारातील हुडको परिसरातील चार जण करोनामुक्त झाले असून तालुक्यातून एकूण सहा जण करोनामुक्त झाले आहेत. तर पाच जणांवर उपचार सुरु आहेत.

Deshdoot
www.deshdoot.com