चाळीसगाव : चार करोना पॉझिटिव्ह रूग्ण आढळले ; एक संशयित रूग्णाचा मृत्यू
Featured

चाळीसगाव : चार करोना पॉझिटिव्ह रूग्ण आढळले ; एक संशयित रूग्णाचा मृत्यू

Rajendra Patil

चाळीसगाव | प्रतिनिधी

चाळीसगावात कालच दोन जण करोनामुक्त झाले, परंतू अवघ्या काही तासाच नव्याने चार जण करोना पॉझिटिव्ह आढळुन आले आहेत. तर एक करोना संशयिताचा जळगाव येथे मृत्यू झाला आहे. त्यामुळे चाळीसगावकरांसाठी ही अतिशय धक्कादायक बाब असून आधिक काळजी घेण्याची गरज आहे.

शहरात काही दिवसापूर्वीच हुडको परिसरातील महिला करोना बाधित झाली होती. आता तिच्या संपर्काती एक महिलाही करोना पॉझिटिव्ह झाली, तर चौधरी वाड्यातील करोना मुक्त झालेल्या रुग्णाच्या संपर्कातील आई, वडील आणि पत्नी अशा तिघांचा तपासणीचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याची माहिती वैद्यकिय आधिकारी डॉ.डी.के.लांडे यांनी दिली.

तर कालच चाळीसगाव येथून जळगाव येथे उपचारासाठी पाठविण्यात आलेल्या शहरातील नागदरोड परिसरातील एक ५२ वर्षीय इसमाचा जळगाव येथे मृत्यू झाला आहे.

चाळीसगावात नव्याने कोरोनाचे चार रुग्ण आढळुन आल्याने तालुकावासियांसाठी हा धोक्याचा इशारा असून आता तरी सावधगीरी पाळण्याची गरज आहे.

Deshdoot
www.deshdoot.com