चाळीसगाव : त्या पोलिसाच्या संपर्कातील कपाऊंडर करोना पॉझिटिव्ह
Featured

चाळीसगाव : त्या पोलिसाच्या संपर्कातील कपाऊंडर करोना पॉझिटिव्ह

Rajendra Patil

चाळीसगाव | प्रतिनिधी

चाळीसगाव शहराजवळ असलेल्या टाकळी प्र.चा.येथील पोलीस कर्मचारी नुकताच कोरोना पॉझिटिव्ह आढळून आला होता. कोरोनाबाधित पोलिसाच्या संपर्कात आलेल्या सर्वांचे स्वॅब घेवून ते तपासणीसाठी जळगाव येथे पाठविण्यात आले.

त्यापैकी पोलिसाने उपचार घेतलेल्या, खाजगी रुग्णालयातील २० ते २२ वर्षीय कंपाऊडरला कोरोनाची लागन झाल्याचे स्पष्ट झाले आहे. त्याचा तपासणीचा अहवाल आज प्राप्त झाल असून तो पॉझिटिव्ह आल्याची माहिती वैद्यकिय आधिकारी डॉ.डी.के.लांडे यांनी दिली आहे.

तर टाकळी प्र.चा.व कळमडू येथील बाकींच्या सर्व अहवाल निगेटिव्ह आल्याची देखील माहिती त्यांनी दिली आहे. आता चाळीसगाव तालुक्यात कोरोना बांधितांची संख्या सहावर जावून पोहचली असून नागरिकांना खबरादरी घेण्याचे आव्हान करण्यात आले आहे.

Deshdoot
www.deshdoot.com