चाळीसगाव शहरात करोनाचा शिरकाव ; हुडको परिसरात महिला पॉझिटिव्ह
Featured

चाळीसगाव शहरात करोनाचा शिरकाव ; हुडको परिसरात महिला पॉझिटिव्ह

Rajendra Patil

परिसर कटेन्मेंट झोन म्हणून घोषीत, २५ जणांचे स्वॅब घेणार, स्क्रीनींग व सर्व्हेचे काम सुरु
बेजाबदार माहिती व पीपीई कीट उघड्यावर टाकणार्‍यावर कारवाई

चाळीसगाव | प्रतिनिधी

चाळीसगावात तालुक्यात ग्रामीण भागात टाकळी प्र.चा., जामडी व सायंगगाव येथे कोरोनाचे प्रत्येक एक रुग्ण आढळुन आले आहेत. तर चाळीसगाव शहरात एकही रुग्ण आतापर्यंत नव्हाता, परंतू शहरातील तहजीब उर्दु हायस्कुल जवळ (हुडको) परिसरात एका ५६ वर्षीय महिला कोरोना पाझिटिव्ह आढळून आली आहे. त्यामुळे वैद्यकिय यंत्रणा चांगलीच हादरली असून तो संपूर्ण परिसर कटेन्मेंट झोन म्हणून घोषीत केला आहे.

तसेच परिसरात सर्व्हे व स्क्रीनिंगचे काम वैद्यकिय पथकाडू चालू आहे. कोरोनाबाधित रुग्णाच्या संपर्कात आल्याच्या संशयावरुन महिलेच्या परिवारातील १७ लोक व शहरातील खाजगी डॉक्टर व कंपाऊडर अशा जवळपास २५ जणांना क्वारंटाईन करण्याची प्रक्रिया सुरु आहे. आज सर्वांचे स्वॅब घेवून ते तपासणीसाठी जळगाव येथे पाठविण्यात येणार असल्याची माहिती वैद्यकिय आधिकारी डॉ.डी.के.लांडे व डॅा.बी.पी.बाविस्कर यांनी दिली आहे.

महिलेवर खाजगी हॉस्पीटलमध्ये उपचार
हुडको परिसरातील त्या महिलेचा तपासणीचा अहवाल रात्री उशिराप्राप्त झाला, दरम्यान ह्या महिलेने शहरातील दोन ते तीन खाजगी हॉस्पीटलमध्ये उपचार घेतल्याची माहिती सामोर येत आहे. एका खाजगी डॉक्टरनेच तिला जळगाव येथे उपचारासाठी जाण्याचा सल्ला दिला होता. त्यानुसार ती जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी गेली असता, त्याठिकाणी तिचा स्वॅब घेवून, तपासणीसाठी पाठवला असता, ती कोरोना बाधित असल्याचे उघड झाले.

कोरोग्रस्त महिला पाचोरा जाऊन आल्याची चर्चा
कोरोनाबाधित महिला ही कुठेली गेली नसल्याचे तिच्या परिवाराकडून सांगण्यात येत आहे. परंतू ही महिला मध्यंतरी वरखेडी ता.पाचोरा येथे लग्नसोहळ्यासाठी जावून आल्याची हुडको परिसरात चर्चा आहे. आणि तेथूनच महिलेला कोरोनाची लागन झाल्याचे बोलले जात आहे.

चुकीची व बेजबादारपणे माहिती पसरविणार्‍यावर यापुढे कारवाई
शहरातील बर्‍याच व्हॉटसअप ग्रुपवर चुकीची व बेजबाबदारपणे कोरोना बद्दल माहिती पसरविली जात आहे. आशांवर आता कडक कारवाई करु, प्रसंगी गुन्हे देखील दाखल करण्यात येईल. अशी माहिती तहसीलदार आमोर मोरे यांनी दिली आहे. कोरोना संबंधीत जबाबदार व्यक्तीलाच माहिती देण्याचा आधिकार आहे, अन्य कोणी कोरोना बद्दलची पोस्ट व्हॉयरल केल्यास त्यांच्यावर कारवाईचा बडगा आता चाळीसगावात उगाराला जाणार आहे. त्यामुळे सोशल मिडीया हातळणार्‍यांनी काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

पीपीई कीट, मास्क व इतर जैवीक उघड्यावर टाकणार्‍यावर गुन्हा
चाळीसगाव शहातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या बाप्पा पॉईट जवळ गेल्या दोन ते तीन दिवसांपासून कोणीतीर अज्ञात व्यक्ती पीपीई किट टाकुन जात होते. यासंदर्भात दैनीक देशदूत आज बातमी प्रसारीत केली होती. या वृत्ताची दखल घेत तहसीलदार आमोल मोरे यांनी यापुढे पीपीई कीट, मास्क व इतर जैवीक वस्तू उघड्यावर टाकणार्‍यांवर यापुढे गुन्हा दाखल करणार असल्याची माहिती दिली. यासंदर्भातील आधिकृत सूचनाच तहसीलदार सायंकाळपर्यंत काढणार असल्याची देखील माहिती त्यांनी दिली आहे.

Deshdoot
www.deshdoot.com