चाळीसगावातील पोलीस  कर्मचारी करोना पॉझिटिव ; चाळीसगावात करोनाचा शिरकाव
Featured

चाळीसगावातील पोलीस  कर्मचारी करोना पॉझिटिव ; चाळीसगावात करोनाचा शिरकाव

Rajendra Patil

चाळीसगाव | प्रतिनिधी 

चाळीसगाव तालुक्यात अखेर कोरोना चा शिरकाव झाला असून चाळीसगावातील पोलीस  कर्मचाऱ्याला कोरोनाची लागन झाल्याचे स्पष्ट झाले आहे.

आज  चाळीसगावतून पाठवलेल्या  तेरा लोकांचे  अहवाल प्राप्त झाले असून एक पोलीस कर्मचारी कोरोना पॉझिटिव निघाला आहे. तर उर्वरित 12 जणांचे अहवाल निगेटिव्ह आल्याची माहिती  डॉ.डी.डी लांडे यांनी दिली.

तळेगाव बरोबरच भडगाव येथे कोरोनाग्रस्ताच्या अंत्ययात्रेसाठी गेलेल्या तालुक्यातील बहाळ येथील पाच जणांना देखील बुधवारी ताब्यात घेण्यात आले आहे,

तर चाळीसगाव-औरंगाबाद महामार्गावरील गस्ती पथकातील एका पोलीस कर्मचार्‍याला जळगाव येथे कोरोना बाधित झाल्याचे उघड झाल्याने, त्यांच्या संपर्कातील चार पोलिसांचे खबरदारी म्हणून स्वॅब घेण्यात आले. तर मुंबई पोलीस दलात कार्यरत असलेला चाळीसगावातील पोलीस शिपाईचा मुंबई येथी ल एकाच रुममध्ये वास्तव्यास असलेला मित्र कोरोना बाधित निघाल्याने, त्यांचा देखील स्वॅब घेण्यात आला.

बुधवारी अशा तब्बल १३ स्वॅब तपासणीसाठी धुळे येथे पाठविण्यात आले होते. त्यांचा तपासणीचा अहवाल आज प्राप्त झाला आहे.

बारा जणांचे अहवाल निगेटिव्ह आल्याची माहिती डॉक्टर लांडे यांनी दिली आहे.

चाळीसगाव आता प्रत्यक्ष रिता कोरोनाचा शिरकाव झाल्यामुळे चाळीसगावकराची चिंता वाढली असून सर्वांनी खबरदारी घेण्याची अत्यंत गरज असल्याचे मत व्यक्त होत आहे.

Deshdoot Digital Dhamaka | देशदूत डिजिटल धमाका
www.deshdoot.com