Wednesday, April 24, 2024
Homeजळगावचाळीसगाव : जावाईकडे आलेले सासू-सासरे औरंगाबादमध्ये कोरोना पॉझिटिव ; चाळीसगाव-मालेगाव सीमा बंदी...

चाळीसगाव : जावाईकडे आलेले सासू-सासरे औरंगाबादमध्ये कोरोना पॉझिटिव ; चाळीसगाव-मालेगाव सीमा बंदी नावालाच

१३ जणांचे स्वॅब तपासणीसाठी, प्रशासनाचा निष्काळजीपणा उघड

चाळीसगाव | प्रतिनिधी

- Advertisement -

तालुक्यातील तळेगाव येथील लेक-जावईकडे कोरोना हॉटस्पॉट ठरलेल्या मालेगाव येथून वृद्ध दाम्पत्य दि.१३ रोजी आले होते. तळेगाव येथे दोन दिवस मुक्काम केल्यानंतर ते पुढे औरंगाबाद येथे मुलाकडे गेले. औरंगाबाद येथे गेल्यानंतर त्यांना कोरोनाची लक्षणे जावून लागल्याने त्यांची तपासणी केल्यानतंर वृद्ध दाम्पत्य हे कोरोना बांधित असल्याचे उघड झाले.

त्यामुळे तळेगाव येथील संबंधीत दाम्पत्यांची लेक जावाई अशा चौघांना कोरोनाबाधितांच्या संपर्कात आल्याच्या संशयावरुन ताब्यात घेवून त्यांचे आज स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात येणार असल्याची माहिती वैद्यकिय सुत्रांनी दिली आहे. भडगाव येथे कोरोनाग्रस्ताच्या अंत्ययात्रेसाठी गेलेल्या तालुक्यातील बहाळ येथील एकाला देखील ताब्यात घेतले असून त्यांचेही स्वॅब घेण्यात आले आहेत.

तर चाळीसगाव-औरंगाबाद महामार्गावरील गस्ती पथकातील एका पोलीस कर्मचार्‍यारी जळगाव येथे कोरोना बाधित झाल्याचे उघड झाले आहे. त्यामुळे त्यांच्या संपर्कात आलेल्या चार ते पाच पोलीसांचे देखील स्वॅब घेण्याची प्रक्रिया सुरु आहे. कोरोनाबाधिताच्या संपर्कात आल्याची संशयावरुन आज तब्बल १३ जणांचे स्वॅब तपासणीसाठी चाळीसगाव येथून जळगाव येथे पाठविण्यात येणार आहेत.

तसेच १३ जणांना क्वारंटाईन करण्यात आले आहे. दरम्यान चाळीसगाव-मालेगाव सीमा बंद केल्याचा प्रशासनाचा दावा फोल ठरत आहे. तालुक्यात अनेक जण मालेगावहुन येत असल्याचे उघड झाले आहे. तसेच तालुका प्रशासन देखील तालुक्यातून बाहेरु येणार्‍याची माहिती ठेवण्यात निष्काळजीपणा करत आहे. त्यामुळे तालुका प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे तालुक्यात कोरोनाचा शिरकाव मोठ्या प्रमाणात होऊ शकतो. त्यामुळे आतापासून कडक पाऊले उंचल्याची गरज असल्याचे बोलले जात आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या