आनंदवार्ता : चाळीसगावातील चौघे करोनामुक्त
Featured

आनंदवार्ता : चाळीसगावातील चौघे करोनामुक्त

Rajendra Patil

आतापर्यंत सहा जणांची करोनावर मात

चाळीसगाव | प्रतिनिधी

चाळीसगावात दोन दिवसांपूर्वी दोन जण करोनामुक्त झाले होते. आता पुन्हा शहरातील हुडको परिसरातील चार जण एकाच दिवशी करोनामुक्त झाल्याची माहिती डॉ.डी.के.लांडे यांनी दिली. यात दोन महिला, एक पुरुष व एका बालकाचा समावेश आहे.

शहरातील हुडको परिसरातील महिला करोनाबाधित झाली होती, गेल्या दहा ते पंधरा दिवसांपूर्वीच चारही जण करोनाग्रस्त महिलेच्या संपर्कात आल्यामुळे, करोना बाधित झाले होते. परंतू त्यांनी आता करोनावर यशस्विपणे मात केली आहे.

त्यांना शहरातील कोव्हिड केअर सेन्टर मधून त्यांना मोठ्या उत्साहात शनिवारी निरोप देण्यात आला. याप्रसंगी प्रातांधिकारी लक्ष्मीकांत सातळकर, तहसीलदार अमोल मोरे व तालुका वैद्यकिय आधिकारी डॉ.डी.के.लांडे उपस्थित होते.

आता शहरातील चौधरीवाड व डोण येथील पाच जण करोना पॉझिटिव्ह असून येथील कोव्हीड सेन्टरमध्ये उपचार घेत आहेत. त्यांची देखील करोनामुक्ती वाटचाल सुरु असून त्यांना देखील लवकरच कोव्हिड केअर सेन्टर मधून सोडण्यात येणार असल्याची माहिती प्राप्त झाली आहे.

तालुक्यात जरी करोग्रस्तांची संख्या हळूहळू वाढू लागली. तरी करोनावर मात करणयाची संख्या देखील त्याच प्रमाणात वाढत असल्यामुळे तालुकावासियांसाठी ही समाधानाची बाब आहे.

आतापर्यंत सहा रुग्णांनी करोनावर यशस्विपणे मात केली आहे. येथील कोव्हीड केअर सेन्टरमध्ये त्यांच्यावर चांगल्या पध्दतीने उपचार झाल्यामुळे ते करोनावर मात करु शकले असल्याची भावना करोनामुक्त झालेल्या रुग्णनी व्यक्त केली आहे.

Deshdoot
www.deshdoot.com