भुसावळ रेल्वे : ७० हजार ३७४ वॅगन्सची मालवाहतूक
Featured

भुसावळ रेल्वे : ७० हजार ३७४ वॅगन्सची मालवाहतूक

Rajendra Patil

मध्य रेल्वेच्या मुंबई, नागपूर, भुसावळ, सोलापूर आणि पुणे विभागातून दररोज लोडिंग, अनलोडिंगसाठी विविध टर्मिनल्सवर सुमारे ७५ रॅक (मालगाड्या) हाताळल्या जात आहेत. ज्यात अन्नधान्य, वीज निर्मितीसाठी कोळसा आणि सिमेंटसारख्या इतर वस्तूंचा समावेश आहे.

२४ बाय ७ तत्त्वावर सतत कार्यरत असलेल्या गुड्स शेड, स्थानके आणि नियंत्रण कार्यालयांमधील रेल्वे कर्मचार्‍यांनी २३ मार्च ते २२एप्रिलपर्यंत १ हजार ४१५ रॅकमध्ये आवश्यक वस्तूंच्या ७० हजार ३७४ वॅगन लोड करण्यारत आल्या आहे.

मध्य रेल्वेच्या सर्वच विभागातून २५२ वॅगनमध्ये धान्य, ४८४ वॅगनमध्ये साखर, ३४ हजार ४९७ वॅगनमध्ये कोळसा, २५ हजार ३८० वॅगन्समध्ये कंटेनर, ५१८३ वॅगन्समध्ये पेट्रोलियम उत्पादने, १८०२ वॅगनमध्ये खते, ६३५ वॅगन्समध्ये स्टील, २५२ वॅगन्समध्ये डि-ऑईल केक आणि ११७ वॅगनमध्ये सिमेंट व १७७२ वॅगनमध्ये विविध वस्तू भरल्या गेल्या.

याचबरोबर सुमारे २२० पार्सल गाड्या वेळापत्रकानुसार चालविल्या जात असून त्यामध्ये औषधे, भाज्या, नाशवंत वस्तू, पोस्टल बॅग इत्यादी आवश्यक वस्तू देशभरात पाठवल्या जात आहेत. मध्य रेल्वेने दि.२१ एप्रिल पर्यंत २ हजार टनाहून अधिक जीवनावश्यक वस्तूंची वाहतूक केली होती. ज्यात औषधे, वैद्यकीय उपकरणे, फळे, भाज्या, अंडी, ज्यूट बियाणे, टपाल पिशव्या आणि कच्चा मालाचा समावेश होता.

Deshdoot
www.deshdoot.com