अमळनेर : संचारबंदीत विनाकारण फिरणाऱ्यांचे टाळ्या वाजवून आमदारांनी केले स्वागत
Featured

अमळनेर : संचारबंदीत विनाकारण फिरणाऱ्यांचे टाळ्या वाजवून आमदारांनी केले स्वागत

Rajendra Patil

अमळनेर – प्रतिनिधी

शहरासह ग्रामीण भागात कोरोना सदृश्य रुग्णांची वाढ झाल्याने निर्माण झालेली आपात्कालीन परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी महसूल आणि पोलीस प्रशासन त्यांच्या परीने लोकांना समजण्याचा प्रयत्न करीत आहेत परंतु तरी सुद्धा अनेक लोक शहरात संचारबंदी लागु असतानाही विनाकारण छोट्या-मोठ्या कामासाठी शहरात फिरत असल्याने त्यांना शेवटचा पर्याय म्हणून गांधीगिरी मार्गाने डोमिनेट करण्याचा फॉर्म्युला आ अनिल पाटील यांनी सुद्य जनतेला सुचविला असून काल आमदारांनी स्वतः त्यांच्या निवासस्थानाबाहेर या फॉर्म्युल्याची अंमलबजावणी केली.

शहरात कोणत्याही गल्ली बोळात अथवा रस्त्यावर कुणीही विनाकारण दिसल्यास त्यांना स्थानिक लोकांनी सोशल डिस्टनसिंग ठेऊन हात जोडून, टाळ्या वाजवुन स्वागत करावे, आणि लांबुन शिटी वाजवुन त्यांच्या फिरण्याचे कौतुक करावे जेणेकरून त्यांना त्यांचीच लाज वाटेल आणि त्यांची चुक त्यांच्या लक्षात येईल असे आवाहन आमदार अनिल भाईदास पाटील यांनी काल फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून अमळनेरसह परिसरातील नागरिकांना केले होते.

यानंतर आमदार अनिल पाटील यांनी याची सुरुवात स्वतःपासून करत त्यांच्या घराच्या अंगणात उभे राहून त्यांनी संचारबंदी लागू असतान विनाकारण जे नागरिक फिरत होते त्यांचे हात जोडुन, टाळ्या वाजवून स्वागत केले,एवढेच नव्हे काहींसाठी त्यांनी शिट्या देखील वाजवून लोकांचे लक्ष वेधुन घेतले.

संबंधित फिरणाऱ्या लोकांना त्यांची चुक लक्षात त्यांनी आणून दिली,त्या लोकांनी देखील याबाबत माफी मागत यापुढे आम्ही विनाकारण फिरणार नाही अशी ग्वाही आमदारांना दिली.,दरम्यान यानंतर शहरात अनेक ठिकाणी हाच फॉर्म्युला अनेकांनी वापरल्याचे दिसून आले.

गांधीगिरी फॉरमूल्याचे स्वागत

आमदारांनी गांधीगिरी मार्गाने केलेल्या उपाययोजनेचे लोकांनी उस्फुर्त पण स्वागत केले, व आमदारांनी स्वतः रस्त्यावर उतरून लोकांना हात जोडून विनवणी केल्यामुळे सदर लोकांना त्याची चूक लक्षात आल्यामुळे ते स्वतः लज्जित होऊन झाल्या प्रकारामुळे स्वतः माफी मागून या पुढे घरा बाहेर न निघण्याचा निर्धार करून घरा कडे रवाना झाले.

Deshdoot
www.deshdoot.com