अमळनेर : कोरोना पॉझिटिव्ह रूग्ण आढळल्याने शासनाने घेतली खबरदारी ; सात किमी. अंतरावरील गावे केले सील
Featured

अमळनेर : कोरोना पॉझिटिव्ह रूग्ण आढळल्याने शासनाने घेतली खबरदारी ; सात किमी. अंतरावरील गावे केले सील

Rajendra Patil

अमळनेर – प्रतिनिधी

तालुक्यातील मुंगसे या गावातील महिला कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे आढळुन आले आहे. ही महिला जळगाव जिल्हा रुग्णालयात शुक्रवारी दाखल झाली होती. मात्र तिचा रिपोर्ट आल्यावर ती पॉझिटिव्ह आढळून आल्याने पुढील कार्यवाहीसाठी अमळनेर उपविभागीय अधिकारी यांच्या दालनात सर्व अधिकाऱ्यांची खबरदारी म्हणून बैठक झाली.

तसेच चोपडा रस्त्यावरील तापी काठावरील मुंगसे गावासह आजूबाजूचे ७ किमी अंतरावरील सावखेडा रूंधाटी दापोरी खूर्द हि चारही गाव सील करण्यात आली आहेत. तर शहरातील मूख्य रस्ते सिल करून रूग्णालयाला लागून असलेले मेडीकल वगळता सर्व मेडीकल किराणा भाजीपाला सर्वच दूकाने तीन दिवस बंद ठेवण्यात आली आहेत.

शहरात संचारबंदीची कडक अंमलबजावणी करण्यात आली आहे. त्या चारही गावांमध्ये रात्रीच फवारणी झाली असून दि.१९ रोजी सुमारे ८ वैद्यकीय पथक जाऊन त्या गावांमधील प्रत्येक नागरिकाची तपासणी करण्यात येत आहे. दरम्यान या बाबत संपूर्ण यंत्रणा सज्ज झाली असून तालुक्याला जिल्हा प्रशासनाकडून अलर्ट करण्यात आले आहे.

तालुक्यातील मूंगसे येथील ६० वर्षीय महिला कोरोना पॉझीटीव्ह निष्पन्न झाली तर शहरातील साळी वाडा भागातील एका महिलेचा मृत्यू झाला आहे सदर महिलेचा अद्याप रिपोर्ट आलेला नाही. त्यामुळे संपुर्ण अमळनेर शहर व अमळनेर तालुक्यात संपूर्ण संचारबंदी लागु असल्यामुळे अमळनेर कृषी उत्पन्न बाजार समिती दि.२० व २१ एप्रिल रोजी बंद राहील, सर्व लिलाव पुर्णपणे बंद राहतील.

बाजार समिती दिनांक २२ एप्रिल २०२० बुधवार पासून नियमितपणे सुरू राहील बाजार समिती या पुढे नियमित पणे सुरू राहील तरी शेतकरी बांधवांना एकाच वेळी गर्दी करू नये. नियमांचे पालन करून बाजार समिती प्रशासनास सहकार्य करावे असे आवाहन सभापती प्रफूल पाटील यांनी केले आहे तर दि २० एप्रील पासून शासनाची कापूस खरेदी केंद्र देखील सूरू होणार होते ते तालूक्यात सूरू हेवू शकणार नाही यामूळे कापूस विक्रीस आणू नये असे आवाहन आ अनिल पाटील यांनी केले आहे शहरात वैद्यकीय सेवा व्यतीरिक्त सर्व कडकडीत बंद आहे.

पॉझिटिव्ह रुग्णाच्या संपर्कातील विदगावच्या दोघांना रुग्णालयात हलवले

अमळनेर तालुक्यातील पॉझिटिव रुग्णाच्या संपर्कात असलेल्या विदगाव येथील चौघांना जळगाव येथील कोरोना रुग्णालयात सकाळी ११:३० वाजता हलवण्यात आले. संपर्कातील नातेवाईक हे विदगाव येथील असल्याचे लक्षात आले असता गावकऱ्यांनी तात्काळ रुग्णालयाशी संपर्क साधून त्या दोघांना रुग्णालयात हलवले.

Deshdoot
www.deshdoot.com