अमळनेर : ४३ वर्षीय पुरुषाचा अहवाल करोना पॉझीटीव
Featured

अमळनेर : ४३ वर्षीय पुरुषाचा अहवाल करोना पॉझीटीव

Rajendra Patil

अमळनेर – प्रततिनिधी

येथील शाहाआलम नगर भागातील ४३ वर्षीय पुरुषाचा अहवाल कोरोना पॉझीटीव आला आहे. जिल्ह्यात आता कोरोना बाधित रुग्णांची संख्या १४ इतकी झाली असून एकट्या अमळनेर तालुक्यात १० कोरोना बाधित रुग्ण आढळले आहेत.

तर दोन रुग्णांचा मृत्यु झाला असून १० रुग्ण कोरोना संसर्ग कक्षात उपचार घेत आहेत, अमळनेर शहरातील साळीवाडा येथील मृत महिलेच्या संपर्कात आलेले पाच जण शुक्रवारी कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत.तर त्यांच्या संपर्कातील पुन्हा १० व्यक्तींना जळगाव येथे जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.यात काही अंशी समाधानाची बाब अशी कि यांचे व्यतीरिक्त या महिलेच्या संपर्कातीलच ईतर ५ जणांचे रिपोर्ट निगेटिव आले आहेत करोनात हॉटस्पॉट झालेल्या अमळनेर शहरातील शाह आलमनगर, अमलेश्वरनगर व साळीवाडा ही तीन ठिकाणे कोरोना हॉटस्पॉट ठरली असून आरोग्य यंत्रणा हादरली आहे. दरम्यान गेल्या महिनाभरात ३१ कोरोना संशयित व्यक्तींपैकी १० पॉझिटिव्ह निघाले. त्यातील दोघांचा मृत्यू झाला तर एकावर उपचार सुरू आहेत.
अमळनेर तालुक्यात आतापर्यंत ३१ कोरोना संशयित व्यक्तींपैकी ३ रुग्ण पॉझिटिव्ह आले होते.

त्यापैकी साळीवाड्यातील मृत महिलेच्या संपर्कातील जवळच्या नातेवाईकां मधील ५ जण शुक्रवारी पॉझिटिव्ह आल्याने शहरातील पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ८ व मुंगसे येथील एक असे एकूण कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण ९ झाले होते.आता त्यात पून्हा एकाची वाढ होवून १० झाल्यामुळे आरोग्य यंत्रणा प्रचंड हादरली असून प्रशासनाने खबरदारीच्या उपाय योजना सुरू केल्या आहेत.बाहेर गावाहून आलेल्या नागरिकांची कसून चौकशी केली जात आहे.

नागरिकांना घरातच राहण्याचे आवाहन केले जात असून विनाकारण बाहेर फिरणाऱ्यावर कारवाई केली जात आहे.
साळीवाड्यातील महिलेचा अंत्यविधी अमळनेर येथेच करण्यात आला होता.

तेथूनच शहरात रूग्णांची वाढ होत आहे तिच्या अंत्ययात्रेवेळी रिपोर्ट आला नव्हता म्हणून नातेवाईकांसह ३५ ते ४० लोकांच्या उपस्थितीत अंत्यसंस्काराचे सर्व विधी पार पाडले होते. त्यावेळी कोरोना रूग्ण घोषीत नसली तरी संशयीत म्हणून खबरदारीच घेतली गेली नाही काल पॉझिटिव्ह आलेल्या ५ व्यक्तींच्या संपर्कातील पुन्हा १० व्यक्तीना व झामी चौकासह शहरातील काही भागातील व्यक्तींनाजळगाव येथे पाठवण्यात आले आहे.

Deshdoot
www.deshdoot.com