अमळनेर : ६५ वर्षीय वृध्दाचा मृत्यू ; करोनामुळे मृतांची संख्या झाली सहा
Featured

अमळनेर : ६५ वर्षीय वृध्दाचा मृत्यू ; करोनामुळे मृतांची संख्या झाली सहा

Rajendra Patil

अमळनेर – प्रतिनिधी

येथील झामी चौकातील ६५ वर्षीय वृद्धाचा मृत्यू जळगाव जिल्हा रूग्णालयात ऊपचार घेतांना आज दुपारी मृत्यू झाला त्यांचा चार दिवसापूर्वी करोना पॉझीटीव अहवाल आला होता. करोनामूळे मृत्यू झालेल्यांची संख्या ६ झाली आहे.

आतापर्यंत १८ रुग्णांपैकी ६ रुग्ण मयत झाले आहेत त्यात सर्वच वृद्ध आहेत इतर १२ रुग्ण उपचार घेत आहेत. तांबेपुरा, सानेनगर संशयित मयतांचे अहवाल अद्याप बाकी आहेत.

सदर मयत वृध्दावर जळगाव मध्येच असलेले नातेवाईक यानी अंत्यसंस्कार करण्यास विरोध दर्शविला होता. दरम्यान जळगावलाच अंत्यसंस्कार करण्यात येणार असून, तेथे त्यांची मुलगी जावई आहेत. तिथे इथून कोणीही त्यासाठी जाणार नाही.

परस्पर अंत्यसंस्कार करण्यात येईल यासाठी त्यांच्या नातेवाईकांना समजविणेसाठी पो.नि.अंबादास मोरे यांनी फोन वरून संपर्क करून विनंती केली. सदर वृध्दाचा मूलगा हा अमळनेर प्रताप महाविद्यलयाच्या वस्तीगृहातील कोविड कक्षात होम क्कॉरंटाईन कक्षात आहे सदर वृध्दाचे बायपास झालेले होते.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com