मेंदुही चकाकतो ?
Featured

मेंदुही चकाकतो ?

Sarvmat Digital

जगाच्या पाठीवरील कोणत्याही जाती-धर्माचा साधक आपल्या साधनेच्या विशिष्ट टप्प्यात अलोकिक आध्यात्मिक अनुभव घेत असतो. असा अनुभव घेत असताना त्याच्या मेंदूतील एक भाग चकाकत असतो, असे संशोधकांना आढळून आले आहे.

हे आध्यात्मिक अनुभवांचे ‘न्यूरोबायोलॉजिकल घर’ असावे असेही त्यांना वाटते. अशा अनुभवांवेळी मेंदूच्या ‘पेरिएटल कॉर्टेक्स’ या भागातील हालचाली वाढतात. हा भाग ‘स्व’बाबतची जागृती एकाग्रता याच्याशी संबंधित आहे. ‘सेरेब्रल कॉर्टेक्स’ या नियतकालिकात याबाबतच्या संशोधनाची माहिती प्रसिद्ध करण्यात आली आहे.

येल चाईल्ड स्टडी सेंटरमधील मार्कपोटेंझा यांनी याबाबतची माहिती दिली. ते म्हणाले आध्याम्मिक स्वरुपाचे अनुभव हे एखाद्या व्यक्तीवर
गाढ प्रभाव टाकणारे असतात. अशा अनुभवांचा चेतासंस्थेतील पाया शोधण्यासाठी हा प्रयत्न केला गेला. मानसिक आरोग्यासाठीही हे संशोधन महत्त्वाचे इरु शकते. ‘आध्यात्मिक’ अनुभव हे रुढार्थाने ‘धार्मिक’ अनुभव असतीलच असे नाही.

निसर्गाशी तादात्म्य पावण्याचा अनुभव असाच आहे. स्वत:ला विसरुन विराट स्वरुपाशी तादात्म्य पावण्याचा हा अनुभव आहे. भारतीय संस्कृतीत उपनिषद म्हणजेच वेदांताने वर्णन केलेला अद्वैताचा अनुीव हाच आहे. चराचराला व्यापून राहिलेल्या एकमेवाद्वितीय ‘ब्रह्म’ नामक चैतन्याशी ज्यावेळी व्यक्ती तादात्म्य पावते त्यावेळी त्याला निर्विकल्प समाधीचा अनुभव म्हटले जाते.

Deshdoot
www.deshdoot.com