Blog – पुस्तकापेक्षा समाज माध्यमांचा प्रभाव वाढला
Featured

Blog – पुस्तकापेक्षा समाज माध्यमांचा प्रभाव वाढला

Sarvmat Digital

जगभरामध्ये आज जागतिक पुस्तक दिन साजरा होत आहे. पुस्तके वाचनाची अभिरुची कमी होत असल्याचे चित्र समोर आहे. सार्वजनिक ग्रंथालय बरोबरच शाळा महाविद्यालयाच्या ग्रंथालय नाही अवकळा आली असल्याचे चित्र आहे. मात्र त्याच वेळी नवनवीन तंत्रज्ञानामुळे माहिती मिळविण्याची साधने वाढली. वाचकांची संख्या घटत असली तरी मराठी पुस्तकांच्या विक्रीची उलाढाल साहित्य संमेलनामध्ये कोटीची कोटी उड्डाणे घेत असल्याची बाब आहे समोर आली आहे.

दरवर्षी 23 एप्रिल हा दिवस जागतिक पुस्तक दिन म्हणून साजरा करण्यात येतो .जगप्रसिद्ध नाटककार शेक्सपियर यांचा जन्मदिवस म्हणून व त्यांच्या स्मृती जतन करण्यासाठी 1995 सालापासून हा दिवस साजरा केला जात असला ,तरी दिवसेंदिवस पुस्तकांचे महत्व कमी होत असल्याची बाब समोर आली आहे. विद्यार्थ्यांच्या मनावर संस्कार करण्यासाठी पुस्तके सर्वाधिक परिणामकारक ठरत असतात असे पूर्वी सांगितले जात. मात्र अलीकडे पुस्तकाची जागा माहिती तंत्रज्ञानामुळे भ्रमणध्वनी, संगणक, दूरदर्शन यासारख्या तंत्रज्ञानाने घेतले आहे. त्यामुळे पुस्तक वाचण्याचे प्रमाण दिवसेंदिवस कमी होत असल्याचे समोर आले आहे. पूर्वी शाळा महाविद्यालय, विद्यापीठ यांची ग्रंथालय किती समृद्ध आहेत यावरती त्यांचा सामाजिक दर्जा अवलंबून राहत होता. अलीकडे अनेक शाळा-महाविद्यालयांमध्ये ग्रंथालय महत्त्व गमावून बसली आहेत. जिथे समृद्ध ग्रंथालय आहेत तिथे पुरेशा प्रमाणात वाचक उपलब्ध नाहीत. पदवी धारण करणारे विद्यार्थी आपल्या संपूर्ण महाविद्यालयीन जीवनात ग्रंथालयात जाऊन पुस्तक न घेता शिक्षण पूर्ण करत असल्याचेही दिसते आहे. शाळा-महाविद्यालयात, ग्रंथालयात पुस्तक वाचनाचा आनंद घेणे असे विद्यार्थ्यांचे प्रमाण दिवसेंदिवस घटत आहे. वाचक मिळत नाहीत म्हणून ग्रंथालय वरती गुंतवणूक कशाला करायची ? असा सवाल महाविद्यालय व्यवस्थापन आपण केला जात आहे. असे असले तरी उद्याच्या भविष्यातील अभ्यासकांसाठी तरी ग्रंथालय समृद्ध असण्याची गरज व्यक्त होत असते. तर शाळा-महाविद्यालयांमध्ये ग्रंथालय अलीकडे कुलूपबंद असल्याचे दिसत आहेत. शाळांना ग्रंथालय पदच उपलब्ध होत नसल्याने पुस्तके कपाटात बंदिस्त राहताना पाहावे लागत आहेत. नोकरी मिळाल्यावर स्वतःला समृद्ध करण्याची गरज म्हणूनही ग्रंथालयाकडे पाहिले जात होते. आता ती गरज भागविण्याची बाब म्हणून पुस्तका कडे पाहण्याचा दृष्टिकोन कमी होत चालला आहे.

पुस्तके विकत घेऊन वाचणार्‍या वाचकांची संख्या घटत असले तरी अजूनही मराठी साहित्य विकत घेऊन वाचणाऱ्यांची संख्या बरी असल्याचे मराठी विक्रेते सांगतात.

मराठी साहित्याची उलाढाल कोट्यावधीची

मराठी साहित्य साहित्य संमेलनामध्ये मोठ्या प्रमाणावर विकले जात असल्याची बाब यावर्षीच्या साहित्य संमेलनात समोर आली होती काही निवडक पुस्तके वाचण्याचे प्रमाण असले तरी ही उलढाल कोट्यावधीच्या पलीकडे जात आहे ही बाप अशा अंधारलेल्या प्रसिद्ध आशादायक आहेत.

नव्या पिढीलाही जुन्या पुस्तकांची ओढ

साधारणपणे पिढी बदलली तिथे पिढीची वाचनाची अभिरुची बदलते मात्र मराठी साहित्यात अजूनही अनेक पिढ्यांवर अधिराज्य करणारे मराठी साहित्यातील पु ल देशपांडे, वि स खांडेकर, वि .वा .शिरवाडकर, नारायण सुर्वे, साने गुरुजी, विनोबा ,द. मा. मिरासदार, विं.दा. करंदीकर, विश्वास पाटील, शिवाजी सावंत, आनंद यादव यासारख्या लेखकांची पुस्तके नव्या पिढीतील वाचकांवर ही अधिराज्य करत आहेत. ययाती, मृत्युंजय, छावा, विशाखा, माझे विद्यापीठ, नांगरणी, झोंबी सारखी पुस्तके नव्या पिढीतील वाचकही अधिक वाचन असल्याचे ग्रंथपालांनी सांगितले.

अनुवादित पुस्तकांचा वाचक वाढला

पुस्तकांची मागणी अधिक असणार्‍या पुस्तकांकडे लक्ष दिले असता, त्यात जगभरातील विविध भाषांमध्ये अनुवादित झालेल्या पुस्तकांना तरुण वाचकांचा प्रतिसाद मिळत आहेत. त्यामुळे गेल्या काही वर्षात मराठी साहित्यातही अनुवादीत साहित्य मोठ्या प्रमाणावर ती प्रकाशित होत आहे. स्पर्धा परिक्षेच्या दृष्टीने बाजारात येणारी पुस्तके यांची विक्रीची उलढाल अधिक असल्याचे सांगण्यात आले. स्पर्धा परिक्षेच्या दृष्टीने पूरक असणारी संदर्भसाहित्याची मागणी अधिक असल्याची बाब समोर आली आहे.

पुस्तकांचे गावं निर्मितीची गरज

समाजामध्ये घडणाऱ्या विविध वाईट घटना लक्षात घेता ,विद्यार्थ्यांमध्ये अधिक चांगले संस्कार होण्यासाठी, पुस्तक वाचण्याची अभिरुची विकसित करण्याची गरज आहेत .त्याकरता महाराष्ट्राने सातारा जिल्ह्यात भिलारी येथे पुस्तकाचे गाव विकसित केले आहे. त्या धर्तीवर प्रत्येक तालुक्यात एक गाव विकसित करण्याची गरज आहे. त्याच बरोबर सार्वजनिक ग्रंथालयाची व्यवस्था अधिक भक्कम करण्याची गरज असून शाळा व महाविद्यालयांमध्ये ग्रंथालय समृद्ध होण्याच्या दृष्टीने विशेष प्रयत्न होणे आवश्यक आहे. पुस्तक वाचन अभिरुची विकसित होण्याच्या दृष्टीने विशेष प्रयत्न आणि मोहीम राबवली गेली तर त्याचा सकारात्मक परिणाम समाजमनावर दिसेल असेही अभ्यासक सांगता आहेत.

– संदीप वाकचौरे 

Deshdoot
www.deshdoot.com