उद्धव ठाकरेंच्या राजीनाम्यासाठी महाविकास आघाडीतील नेत्यांचं प्लॅनिंग – चंद्रकांत पाटील
Featured

उद्धव ठाकरेंच्या राजीनाम्यासाठी महाविकास आघाडीतील नेत्यांचं प्लॅनिंग – चंद्रकांत पाटील

Dhananjay Shinde

सार्वमत

पुणे (प्रतिनिधी) – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या राज्यपाल कोट्यातून विधान परिषदेच्या आमदार नियुक्तीचा प्रस्ताव राज्यपालांकडे असून ते निर्णय घेतील. मात्र, महाविकास आघाडीतील काहींना राज्यपालांनी हा प्रस्ताव मान्य करू नये, असं वाटतं आहे. उद्धवजींनी आमदार होऊ नये म्हणजे त्यांना राजीनामा द्यावा लागेल, असं काहिंना वाटत आहे. त्यानंतर मग ज्याच्यासाठी प्रयत्न चालू होते, त्यांना पुढे करता येईल, असं महाविकास आघाडीचं राजकारण सुरू असल्याचा आरोप भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांनी केला आहे.

राज्यात कोरोनामूळं नागरिकांचं आरोग्य धोक्यात आलंय. अशी परिस्थिती मुख्यमंत्री उद्धवजींच्या राज्यसभेच्या नियुक्तीवरून राजकीय वातावरण तापलंय. महाविकास आघाडी आणि भाजपमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू आहे. त्यातच भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी नवीन राजकीय गुगली टाकली.

उद्धवजींच्या विधान परिषदेचा प्रस्ताव राज्यपालांकडे असून ते निर्णय घेतील. माञ महाविकास आघाडीतील काहींना राज्यपालांनी हा प्रस्ताव मान्य करू नये, असं वाटतंय. उद्धवजींनी आमदार होऊ नये म्हणजे त्यांना राजीनामा द्यावा लागेल, असं काहिंना वाटत असल्याचा आरोप चंद्रकांत पाटलांनी केला. एक दिवसाचा राजीनामा देऊन पुन्हा त्यांना शपथ घेता येणार नाही.

त्यानंतर मग ज्याच्यासाठी प्रयत्न चालू होतं, त्यांना पुढे करता येईल, असं महाविकास आघाडीचं राजकारण सुरू असल्याचा आरोप दादांनी केला.  तर उद्धवजी मुख्यमंत्री कायम राहू नये यासाठी या वातावरणात आघाडीत कोण बैठका घेत आहे. दिल्लीत कोण घेत आहे. असं म्हणत आघाडीकडे बोट दाखवले आहे. आघाडीमध्ये ताळमेळ नाही. राज्यपाल नियुक्त सदस्यचा ठराव करण्याचा कायदेशीर ज्ञान नाही. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत ठराव केला. मात्र ते घटनात्मक पद नसून ते राजकीय पद आहे. घटनेनुसार मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत जो ठराव होतो तोच ठरव असतो असे चंद्रकांत पाटील म्हणाले.

Deshdoot
www.deshdoot.com