भुसावळ : ऑर्डनन्स फॅक्टरींच्या ८२ हजार कर्मचार्‍यांचा आज उपवास
Featured

भुसावळ : ऑर्डनन्स फॅक्टरींच्या ८२ हजार कर्मचार्‍यांचा आज उपवास

Balvant Gaikwad

Balvant Gaikwad

आयुध निर्माणींच्या खाजगीकरणाला विरोध : राबवणार लंच बायकॉट अभियान

भुसावळ –

देशभरातील आयुध निर्माणींचे निगमीकरण करण्याच्या केंद्र शासनाच्या निर्णयाच्या विरुद्ध सरकारचे लक्ष वेधण्यासाठी तालुक्यातील भुसावळ व वरणगाव आयुध निर्माणीसह देशभारातील ४१ निर्माणीतील ८२ हजार कर्मचारी दि. २९ रोजी एक दिवसा उपवास ठेऊन आंदोलन करणार आहे.

येथिल आयुध निर्माणीत केंद्र सरकारद्वारा घेण्यात आलेला आयुध निर्माणींच्या निगमिकरण निर्णय रद्द करण्यासाठी दि.२१ व २२ रोजी कामगारांनी काळ्या फित लावून पंतप्रधान, रक्षा मंत्र्यांना ई-मेल अभियानास राबविले. त्यानंतर आज दि. २९रोजी संरक्षण क्षेत्रात कार्यरत आयडीईएफ, आयएनडीडब्लूएफ, बीपीएमएस यांच्या राष्ट्रीय स्तरावर स्थापित संयुक्त संघर्ष समितिच्या आदेशानुसार देशभरातील ४१ आयुध निर्माणीतुन सर्व ८२ हजार कर्मचारी सकाळी कामावर जातांना निदर्शने करतील व दुपारच्या जेवणाचा त्याग करतील.

उपवास ठेवून प्रदर्शन करतील व सरकारचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करतील. भुसावळ व वरणगाव येथील निर्माणीत कर्मचारी दुपारी जेवणाचा त्याग करतील व सरकारचा विरोध दर्शवतील. यासाठी स्थानिक संयुक्त संघर्ष समितिचे सर्व पदाधिकारी आंदोलनासाठी प्रयत्न करीत असल्याची माहिती संयुक्त संघर्ष समितिचे संयोजक तथा निर्माणी बोर्ड कोलकत्ताचे जेसीएम ३ सदस्य दिनेश राजगिरे यांनी कळविले आहे.

Deshdoot
www.deshdoot.com