भुसावळ : शहरात आज पाच करोना बाधित रूग्ण आढळले ; बाधित रूग्णांची संख्या झाली 455
Featured

भुसावळ : शहरात आज पाच करोना बाधित रूग्ण आढळले ; बाधित रूग्णांची संख्या झाली 455

Rajendra Patil

जळगाव –

जिल्ह्यातील भुसावळ व भडगाव येथील स्वॅब घेतलेल्या संशयित कोरोना व्यक्तीपैकी 30 व्यक्तींचे तपासणी अहवाल नुकतेच प्राप्त झाले असून त्यापैकी 24 व्यक्तींचे तपासणी अहवाल निगेटिव्ह आले आहेत. तर पाच व्यक्तीचे तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आले.

तसेच एका व्यक्तीचा पुर्नतपासणी अहवालही पॉझिटिव्ह आला आहे. पॉझिटिव्ह आढळलेल्या व्यक्ती भुसावळ शहरातील फालक नगर, गुंजाळ कॉलनी, गांधीनगर व दिपनगरातील आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत कोरोना बाधित रूग्णांची संख्या 455 इतकी झाली आहे. अशी माहिती जिल्हा प्रशासनाच्यावतीने देण्यात आली आहे.

Deshdoot
www.deshdoot.com