वाघूर पुलावरून पडून दुचाकीस्वार ठार 
Featured

वाघूर पुलावरून पडून दुचाकीस्वार ठार 

Balvant Gaikwad

तालुक्यातील साकेगाव महामार्गावर वाघुर नदीच्या तुटलेल्या कठड्यावरून जीव वाचवण्याच्या नादात  झोल गेल्याने पुलावरून पडून दुचाकीवर मागे स्वार असलेला भुसावळचा तरुण ठार झाल्याची घटना ९ रोजी घडली.सतीश रामचंद्र कुकरेजा (३२) हा त्याचा मित्र प्रदीप तलरेजा याच्यासह नेहमीप्रमाणे जळगाव येथे मोबाईल दुकानावर दुचाकी क्र एमएच-१९-बी़टी-४१०६ या दुचाकीवरून भुसावळ ते जळगाव येथे असलेली मोबाईल दुकानावर जात असताना ,
साकेगाव जवळील महामार्गावर जीर्ण झालेल्या व कठडे तुटलेल्या  पुलावर समोरून भरधाव आलेल्या कार समोर येताच तोल गेल्याने मागील सीटवर बसलेला सतीश कुकरेजा याने कठडे पकडण्याचा प्रयत्न केला मात्र कठडे हातात न आल्याने व सरळ तोल पुला खाली गेल्याने कुकरेजा यांच्या शरीरात प्रचंड प्रमाणात रक्तस्त्राव झाले तसेच  फ्रॅक्चर झाले.
तिथे उपस्थित असलेल्या महामार्गावरील कर्मचाऱ्यांनी त्वरित कुकरेजाला उपचारार्थ गोदावरी रुग्णालय येथे हलविले मात्र त्याचे दुर्दैवी निधन झाले.
त्यांच्या पश्चात दुग्ध व्यवसाय करणारे वडील रामचंद्र कुकरेजा, दोन वर्षाची मुलगी, आई-वडील असा परिवार आहे. घटनेमुळे सिंधी कॉलनीत शोककळा पसरली आहे. तपास एपीआय अमोल पवार करीत आहे.
Deshdoot
www.deshdoot.com