भुसावळ : कुऱ्हे ( पानाचे ) येथे एकावर चाकू हल्ला
Featured

भुसावळ : कुऱ्हे ( पानाचे ) येथे एकावर चाकू हल्ला

Balvant Gaikwad

 तालुक्यातील कुऱ्हे ( पानाचे ) येथे जुगाराच्या अड्ड्याच्या स्पर्धेतून एकावर चाकू हल्ला करण्यात आल्याची घटना शुक्रवार रोजी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास घडली.
त्यात शरद पाटील हे जखमी झाले असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात औषध उपचार सुरु आहे . या घटनेमुळे गावात एकच खळबळ उडाली आहे.  पोलिस स्टेशनला रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. दरम्यान , अक्षय तृतीयाच्या पूर्वसंध्येलाच ही घटना घडल्यामुळे जुगा-यामध्ये चांगलीच खळबळ उडाली आहे.
दरम्यान , पोलीस निरीक्षक रामकृष्ण कुंभार यांच्याशी संपर्क साधला असता ,  पैशातून वाद झाला होता.  लोखंडी हत्याराने मारहाण करण्यात आली,असल्याची माहिती यांनी दिली . मात्र घटनेचा तपास सुरू आहे  . असे त्यांनी सांगितले.
गावाच्या पश्चिमेला चौरंगीनाथ महाराजांच्या मंदिराजवळील टेकडीच्या पायथ्याशी बाधलेल्या हॉल बाहेर शरद पाटील झोपले होते . यावेळी एक अज्ञात इसम त्यांचे जवळ आल्यावर त्यांच्या चेहऱ्यावर , डोक्यावर व मान्यवर हल्ला केला . यात पाटील हे गंभीर जखमी झाले. त्यांनी आरडाओरड केल्यामुळे जवळच असलेल्या जुगाराच्या अड्ड्यावरील काही लोकांनी त्यांना भुसावळ येथे खासगी रुग्णालयात उपचारासाठी नेले.
तालुका पोलिस स्टेशनला मात्र रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. आरोपी घटना घडल्यानंतर फरार झाला आहे . त्याचे नाव समजू शकले नाही . गुन्हा दाखल केल्यानंतर नाव देण्यात येईल असे सांगण्यात आले.
Deshdoot
www.deshdoot.com