Friday, April 26, 2024
Homeनगरभीमा कोरेगाव, मराठा आंदोलनाचे गुन्हे मागे

भीमा कोरेगाव, मराठा आंदोलनाचे गुन्हे मागे

मुंबई – भीमा कोरेगाव हिंसाचार प्रकरणातील 348 गुन्हे तर मराठा आरक्षण आंदोलनातील 460 गुन्हे राज्य शासनाकडून मागे घेण्यात आले आहेत, अशी माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी विधानपरिषदेत दिली. तसेच या प्रकरणातील इतरही अनेक गुन्हे मागे घेण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. देशमुख म्हणाले, भीमा कोरेगाव हिंसाचारप्रकरणी एकूण 649 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

यांपैकी सध्या 348 गुन्हे मागे घेण्यात आले आहेत. उर्वरित गुन्हे देखील मागे घेण्याचे काम सुरु आहे. त्याचबरोबर, मराठा आरक्षण आंदोलन प्रकरणातील 548 पैकी 460 गुन्हे मागे घेण्यात आले आहेत. या प्रकरणी सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान आणि पोलिसांवरील हल्ल्यांसारख्या गंभीर स्वरुपाचे गुन्हे मागे घेतले जाणार नाहीत, असेही देशमुख यांनी यावेळी स्पष्ट केले.

- Advertisment -

ताज्या बातम्या