Friday, April 26, 2024
Homeजळगावपाऊस साधारण, अर्थव्यवस्थेसमोर संकट ; भेंडवळचे भाकीत

पाऊस साधारण, अर्थव्यवस्थेसमोर संकट ; भेंडवळचे भाकीत

दीपक सुरसे,शेगाव  – 

खरीप हंगामात मृग नक्षत्रात जून महिन्यात पेरणीयोग्य साधारण पाऊस, जुलैमध्ये चांगला पाऊस, ऑगस्टमध्ये कमी-जास्त पाऊस तर सप्टेंबरमध्ये चांगला आणि अवकाळी पाऊस असल्यामुळे पूर परिस्थिती अतिवृष्टीची शक्यता आहे.

- Advertisement -

घटामध्ये ठेवलेली करंजी गायब आहे. त्यामुळे अर्थव्यवस्थेचे प्रतीक गायब असल्याने जागतिक आर्थिक संकट ओढवण्याची भीती भेंडवळ येथील सुप्रसिद्ध घटमांडणीत व्यक्त करण्यात आले. देशात नैसर्गिक आपत्ती ओढावेल,असे भाकितही मांडले आहे.

साडेतीनशे वर्षाची परंपरा भेंडवळची घटमांडणी अक्षयतृतीयेला केली. त्यानंतर पुंजाजी महाराज यांनी मंगळवारी त्याचे भाकित सांगितले. कपाशीचे पीक साधारण येणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या