परदेशातून परतलेल्या नातलगांशी संपर्क आलेल्या बाळाला नगरला हलविले
Featured

परदेशातून परतलेल्या नातलगांशी संपर्क आलेल्या बाळाला नगरला हलविले

Sarvmat Digital

संगमनेर (शहर प्रतिनिधी) – परदेशातून परतलेल्या आजी-आजोबांशी संपर्क झालेल्या तेरा महिन्याच्या बालकाला उपचारासाठी नगर येथे हलविण्यात आले आहे. येथील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी हे बालक दाखल झाले होते.

संगमनेर शहरालगतचे एक आजी आजोबा सौदी अरेबिया येथे गेले होते. ते काही दिवसांपूर्वी संगमनेरात परतले आहे. या घरातील तेरा महिन्याच्या बालिकेला शहरातील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. रुग्णालयातील डॉक्टरांनी अधिक चौकशी केली असता त्यांना सौदी अरेबिया प्रवासाची माहिती मिळाली. या आजी-आजोबांचा तेरा महिन्याच्या नातीशी संपर्क आल्याचे चौकशीत समजले.

सदर खाजगी रुग्णाल्याने ही माहिती त्वरीत घुलेवाडीच्या ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी यांना दिली. माहिती मिळताच सदर वैद्यकीय अधिकार्‍यांनी सदर बालिकेला पुढील उपचारासाठी तातडीने नगर येथे पाठविले आहे.

Deshdoot
www.deshdoot.com