Friday, April 26, 2024
Homeनगरश्रीगोंदा – पोलीस स्टेशनमध्ये सुध्दा होणार सॅनिटायझेशन टॅनल

श्रीगोंदा – पोलीस स्टेशनमध्ये सुध्दा होणार सॅनिटायझेशन टॅनल

श्रीगोंदा – येथील पोलीस स्टेशनच्या आवारात येतांना सॅनिटायझरच्या टनेल मधून यावे लागणार असून यातून पुढे येताना या सॅनिटायझर चा शिडकाव अंगावर होणार आहे. अधिकारी,कर्मचारी व पोलिस आहेत. कोरोनाचा संसर्ग त्यांना कधीही होऊ शकतो ही भीती त्यांच्या मनात सतत असली तरी कर्तव्यदक्ष हे लोक जीवाची बाजी लावून जनतेसाठी खंबीरपणे उभे आहेत. कोरोना बाबत खबरदारी म्हणून हे बसवण्यात येणार आहे.

पुण्यातील सहा पोलिस ठाण्याच्या धर्तीवर श्रीगोंदा पोलिस ठाण्यात हे बसवणार येणार आहे. हे सॅनिटायजेशन टनेल तयार करीत असलेले येथील रमेश हिरवे म्हणाले, पीव्हीसी पाईप असणारा हा टनेल आठ फूट उंच, सहा फूट लांब व पाच फूट रुंद आहे. यात फॉगर स्प्रे सिस्टीम केली आहे.
तेथे असणाऱ्या ड्रम मध्ये सॅनिटायझर टाकायचे. त्या टनेल मध्ये जाणार पोलिस अथवा व्यक्ती कपड्यासाहित पूर्णपणे सॅनिटायझिंग स्प्रे होऊनच पुढे जाणार आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या