कोविड-19 चा रक्तगटाशी संबंध

कोविड-19 चा रक्तगटाशी संबंध

प्रा.डॉ.पी.एस.लोहार
(8806832020)

अमेरिकेच्या जैवतंत्रज्ञान क्षेत्रात अग्रेसर नॅशनल सेंटर फॉर बायोटेक्नॉलॉजी इन्फॉर्मेशन (एनसीबीआय) यासंस्थेकडे असलेल्या संगणिकृत माहितीस्रोतानुसार, भारतात ‘ज’ हा रक्तगट सर्वात जास्त म्हणजे 37.12 टक्के आहे. त्यानंतर रक्तगट ‘इ’ 32.26 टक्के आहे. त्यानंतर ‘अ’ 22.88 टक्के आहे, तर ‘अइ’ 7.74 टक्के सर्वात कमी असा रक्तगट आहे. सदर लेखाद्वारे कोरोना विषाणूचा संसर्ग व रक्तगट यांच्यातील संबंध विषद करण्याचा प्रयत्न केला आहे.

परदेशवारी करून भारतात परतल्यामुळे कोरोनाचा पहिला रुग्ण जानेवारी महिन्यात आढळला होता. त्यांनतर कोरोनाचा संसर्ग वाढत गेला आणि आज आपल्या देशात कोविड-19चे 2.50 लाखांपेक्षा जास्त रुग्ण झालेले आहेत. सुरुवातीच्या काळात या रोगास कारणीभूत डठड-र्उेीं2 या विषाणूचा अ रक्तगट असलेल्या व बाधित झालेल्या व्यक्तींशी काहीही संबंध नाही, असे सांगितले जात होते.

परंतु जसजसे कोविड-19 मुळे मृत्यूचे प्रमाण वाढत गेले; तसतसे संशोधन अद्ययावत होत गेले आणि रक्तगट ‘अ’ असलेल्या लोकांमध्ये कोरोना विषाणूचा संसर्ग होण्याचा धोका जास्त असतो तर ‘ज’ रक्तगट असणार्‍यांना प्राणघातक विषाणूचा संसर्ग होण्याची शक्यता कमी आहे असा एका नवीन संशोधनानुसार खुलासा झाला आहे. दक्षिण चायना मॉर्निंग पोस्टच्या अहवालानुसार, प्राथमिक अभ्यासात चीनमध्ये त्या रूग्णांचे रक्तगट तपासले गेले जे या आजाराला बळी पडले होते. त्यांच्यामते कोविड-19 चे प्रमाण इतरांपेक्षा ‘अ’ रक्तगट असलेल्या व्यक्तींमध्ये जास्त आढळून आले आहे.

वुहान युनिव्हर्सिटीच्या झोंगनान हॉस्पिटलमध्ये ‘सेंटर फॉर एविडेंस-बेस्ड अँड ट्रान्सलेशनल मेडिसिन’ यांच्या संशोधकांनी वुहान आणि शेंजेनमधील 2000 पेक्षा जास्त संक्रमित रूग्णांच्या रक्तगटांचे नमुने तपासले. तेव्हा त्यांना असं आढळून आलं की, रक्तगट अ मधील रुग्णांमध्ये अधिक संक्रमण होत आहे आणि त्यांच्यात अधिक गंभीर लक्षणे आढळून येत आहेत. हे निष्कर्ष सर्व लिंग आणि वयोगटांना लागू आहेत. मात्र, ही प्राथमिक तपासणी आहे. जेव्हा संशोधकांनी याबाबत अधिक अभ्यास केला, तेव्हा त्यांना आढळले की, ज्या 206 जणांचा मृत्यू कोविड-19 मुळे झाला; त्यापैकी तब्बल 85 जणांचा रक्तगट ‘अ’ आहे. तर ‘ज’ रक्तगट असणार्‍या 52 जणांचा मृत्यू झाला आहे.

‘ज’ रक्तगटापेक्षा ‘अ’ रक्तगट असलेल्या व्यक्तींना कोरोना व्हायरसमुळे मृत्यूचा धोका जास्त आहे. संशोधनात म्हटलं आहे की, ‘अ’ रक्तगट असलेल्या लोकांना संसर्ग होण्याची शक्यता कमी करण्यासाठी त्यांनी अधिक सजग व सावध राहणे गरजेचं आहे. पण याचा अर्थ असा नाही की, जर आपला रक्तगट ‘ज’ आहे म्हणून आपण पूर्णपणे सुरक्षित आहात. आपणदेखील सर्व सुरक्षित मार्गदर्शक तत्त्वांचे अनुसरण करणं गरजेचं आहे.

नुकतेच जर्मनीच्या केईल विद्यापीठातील जनुकीय संशोधकांनी रक्तगट असलेल्या व कोविड-19 ने बाधित 1610 रुग्ण ज्यांना व्हेंटिलेटरवर ठेवलं आहे अशा व्यक्तींचे रक्ताचे नमुने घेऊन गुणसूत्रांचे विश्लेषण केले व त्याची तुलना 2205 निरोगी रक्तदात्या व्यक्तींच्या गुणसूत्रांशी केली. मानवी गुणसूत्रात एकूण 300 करोड पैकी फक्त 90 लाख जनुकीय अक्षरे (ए, टी, जी, सी) यांचे जिनोटाइपिंग करून शोधून काढले की, अ रक्तगटासाठीचे प्रथिनं (अँटिजन) तयार करणारा जनुक, कोरोना विषाणूला पेशींच्या आत प्रवेश घेण्यास मदत करणारा अँजिओटेंसिंन कन्व्हरटिंग एंझाईम (अउए2) तयार करणारा जनुक व रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास कारणीभूत अँटिबॉडी तयार करणारा जनुक यांच्या खूप जवळचा संबंध आहे.

या समूहात जनुकीय बदल होत असल्याने कोरोना विषाणूचा संसर्ग रक्तगट अ असलेल्या व्यक्तीस जास्त प्रमाणात होतो, असा संशोधकांचा दावा आहे. फिनलँडच्या हेलसिंकी विद्यापीठासह एकूण 46 देशातील शास्त्रज्ञांनी ‘कोविड-29 होस्ट जेनेटिक्स एनिसिएटीव्ह’ नावाचा संशोधन प्रकल्प सुरू केला आहे. त्यात जागतिक स्तरावर कोरोना विषाणूचा संसर्ग झालेल्या व्यक्तींच्या जनुकांतील बदलांचा अभ्यास होत आहे व या संशोधनाचा फायदा औषधनिर्माण क्षेत्रातील वैज्ञानिकांना निश्चित होईल, असा दावा करण्यात येत आहे.

AD
No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com