कोरोना, लॉकडाऊन व पर्यावरण
Featured

कोरोना, लॉकडाऊन व पर्यावरण

Balvant Gaikwad

Balvant Gaikwad

कोरोनाव्हायरस प्रेरित लॉकडाऊन केवळ हवेच्या गुणवत्तेच्या दृष्टीने फायदेशीर ठरत नाही तर पाण्याची गुणवत्ता आणि नदीच्या यंत्रणेच्या आरोग्यावरही त्याचा अधिक

<span style="color: #ff0000;"><strong>सौ. पौर्णिमा शिंपी</strong></span>
<span style="color: #ff0000;"><strong>सौ. पौर्णिमा शिंपी</strong></span>

परिणाम झालेला दिसून आला आहे. कारखाने, उद्योगधंद्यामधून रासायनिक प्रदूषकांचे नद्यांमध्ये विसर्ग पूर्णपणे बंद झाले आहे ज्यामुळे शहरी समुद्राजवळ वाहणार्‍या नद्यांच्या प्रदुषण भागात विलक्षण घट झाली आहे. तथापि नद्यांच्या स्वयं-शुध्दीकरण क्षमतेत देखील वाढ झाली आहे.

सौ. पौर्णिमा शिंपी 9028527761

जगभर हाहाकार माजवणार्‍या भयंकर अशा या अदृश्य विषाणूजन्य आपत्तीची संपूर्ण पृथ्वीवरील मानवजात स्वतः साक्षी आहे. या विषाणूने अगदी त्याला सळो कि पळो करून सोडले आहे. 2020 मधील ही सर्वात मोठी आपत्ती म्हणजे र्लेींळव-19 सार्स कोव्हीड-2. आज जवळपास लाखांहून अधिक मानवांना कोरोनाचा चा संसर्ग झाला आहे. तर आजतायागत जगभरात कोरोना विषाणूच्या संसर्गाने लाखांहून अधिक मृत्यू झाल्याची नोंद आहे. कोरोना विषाणूचे संक्रमण व त्यामुळे होणार्‍या अनपेक्षित मृत्यूची आकडेवारी ही भयंकर परिस्थितीची तीव्रता दर्शविते. जागतिक आरोग्य संघटनेनेदेखील याला जागतिक महामारी म्हणून घोषित केले आहे. कोरोनाव्हायरसचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता जगातील सर्व देशांनी राष्ट्रीय आणीबाणीची घोषणा करत या संसर्गाचे प्रसारण नियंत्रित करण्यासाठीचे आंशिक व संपूर्ण लाँकडाऊन स्वीकारले आहे.

भारताच्या लोकसंख्येचा विचार करता भारताचा लोकसंख्येमध्ये जगात दुसरा क्रमांक लागतो. त्यामुळे भारतीय लोकसंख्या या अति संक्रमक विषाणूपासून परके नाही आणि म्हणूनच सुरुवातीच्या काळात या संसर्गजन्य कोरोना विषाणूची साखळी तोडण्यासाठी भारत सरकारने काही कडक व सतर्कतेचे धोरण स्वीकारत 20 मार्च 2020 पासून संपूर्ण देशात लाँकडाऊन जाहीर केले.या साथीच्या परिस्थितीमुळे सर्वकाही ठप्प झाले आहे. मग ते उद्योगधंदे असो, कंपन्या किंवा शाळा अथवा कारखाने, सर्वत्र व्यापक कोरोनाव्हायरस संसर्गामुळे तात्पुरते बंद केले आहे. यामुळे उड्डाणे आणि इतर प्रवासही रद्द केले गेले. ह्या लाँकडाऊनच्या कालावधीत काही लोकांनी आपली नोकरी गमावली आहे तर काही लोक रोजचे अन्न मिळवण्यासाठी धडपडत आहे.

इंडियन प्रीमियर लीग, वर्ल्ड अथलेटिक्स् इनडोअर चॅम्पियनशिप आणि फेसबुक ची वार्षिक परिषद यासारख्या बर्‍याच प्रमुख परिषद आणि कार्यक्रम या साथीच्या आजारांमुळे रद्द झाले आहेत.बर्‍याच देशांनी व्हिसा देण्यास मर्यादा घालत, सीमा वाढवल्या आहेत. आजकाल सामाजिक अंतर आणि वर्क फ्रॉम होम हे प्रत्येकाच्या जीवनात नवीन मानक बनले आहे.

लाँकडाऊन व त्याचा मानवी जीवनावर होणारा परिणाम बाजूला ठेवून जर पर्यावरणाच्या दृष्टीने विचार केला तर ह्या लाँकडाऊन कालावधीत पर्यावरणावरही परिणाम झाला आहे यातूनच असे काही धडे मिळाले आहे ज्याकडे आपल्याला दुर्लक्ष करून चालणार नाही. देशव्यापी लाँकडाऊनमध्ये देशभरातील अत्यावश्यक क्षेत्रे वगळता सर्व प्रकारचे कारखाने, उद्योगधंदे, बांधकाम कामे, सार्वजनिक व वैयक्तिक वाहतूक बंद आहे. यापैकी बहुतेक क्षेत्रांमध्ये जीवाश्म इंधन आधारित ऊर्जा स्त्रोतांचा वापर केला जातो. जे अँथ्रोपोजेनिक प्रदूषके व ग्रीनहाउस वायूंचे मुख्य स्त्रोत आहेत.हेच मुख्य दोन घटक हवामान बदलास जबाबदार ठरतात. परंतु लाँकडाऊनच्या काळात वाहनांच्या व औद्योगिक उत्सर्जनावरील सत्तेवरील निर्बंधामुळे हवेची गुणवत्ता सुधारण्यास मदत झाली आहे. तशी प्रतिमा अलीकडेच नासाच्या नॅशनल एरोनाँटीक्स् स्पेस अँण्ड अँडमिनिस्ट्रेशनने प्रसिद्ध केली,ज्यामध्ये एरोसोल ची पातळी उत्तर भारतामध्ये यावर्षी गेल्या 20 वर्षातील सर्वात कमी दर्शविली गेली. हे क्षेत्र जगातील सर्वात प्रदूषित प्रदेशांपैकी एक आहे. एरोसोल हे लहान घन व द्रव कण आहे जे मानवी आरोग्यासाठी हानिकारक आहे .एवढेच नव्हे तर प्रदूषण कमी होत असल्यामुळे शहरी भागातही रात्रीच्या आकाशात चमकणारे तारे स्पष्ट दृष्टीस पडले आहे. शिवाय दिवसा दृश्यमानता वाढली आहे.एवढंच नव्हे तर अलिकडे पंजाबच्या जालंधर शहरामधून जे हिमालय पर्वतापासून 100 कि.मी अंतरावर वसलेले आहे.अशा या शहरामधून हिमालय पर्वताचा अद्भूत नजारा दृष्टीस पडला.

कोरोनाव्हायरस प्रेरित लॉकडाऊन केवळ हवेच्या गुणवत्तेच्या दृष्टीने फायदेशीर ठरत नाही तर पाण्याची गुणवत्ता आणि नदीच्या यंत्रणेच्या आरोग्यावरही त्याचा अधिक परिणाम झालेला दिसून आला आहे. कारखाने, उद्योगधंद्यामधून रासायनिक प्रदूषकांचे नद्यांमध्ये विसर्ग पूर्णपणे बंद झाले आहे ज्यामुळे शहरी समुद्राजवळ वाहणार्‍या नद्यांच्या प्रदुषण भागात विलक्षण घट झाली आहे. तथापि नद्यांच्या स्वयं-शुध्दीकरण क्षमतेत देखील वाढ झाली आहे. भारत सरकार कोट्यावधी पैसा लावत या नद्यांना शुद्ध करण्याचे काम कित्येक अशा प्रोजेक्टच्या माध्यमांद्वारे हाती घेत असते पण हवा तसा निकाल सरकारला एवढा पैसा खर्च करून देखील मिळाला नव्हता जितका ह्या लॉकडाऊनच्या कालावधीत मिळाला.

वातावरण शांत व स्थीर झाल्यावर वन्यजीवन नेहमीच आनंदी असते वन्यप्राणी केवळ त्यांच्याच भागातच नव्हे तर बाहेरील भागात देखील फिरत असतात. अगदी अशाच प्रकारचे चित्र या कालावधीत दिसून आले. मानवाने आजवर वन्यप्राण्यांच्या निवासस्थानावर आपला हक्क गाजवत जे काँक्रीटचे जंगल विकसित केले आहे त्याच जंगलात आज हे वन्यप्राणी मुक्तपणे संचार करत असताना दिसत आहे, जणू काही आपल्या जागेचा हक्क ते सांगत आहे.

आज ह्या लाँकडाऊन कालावधीत माणसाला अनेक नवीन सवय स्वतःला लावून घ्याव्या लागत आहे. एक प्रकारे तो या बंदिस्त वातावरणाशी तडजोड करत आपले दिवस काढत आहे. लाँकडाऊनमधील नवीन सवयी शहरी वातावरणात अशा प्रकारे बदलत आहे. जे निसर्गासाठी सकारात्मक आणि नकारात्मक दोन्ही असू शकतात. आजच्या जागतिक पर्यावरण दिनाचे सार्धम्य साधत एक गोष्ट खूप कळकळीने इथे मांडावीशी वाटते ती म्हणजे हे स्पष्ट आहे की मनुष्याचा लाँकडाऊन निसर्ग आणि जैवविविधतेस त्यांचे नैसर्गिक स्थान पुन्हा शोधण्यास मदत करत आहे म्हणून लाँकडाऊनमधील मिळालेला कालावधी ही मानवाला मिळालेली एक संधी म्हणता येईल. जी त्याला जाणीव करून देत आहे की त्याच्या अति प्रमाणात केलेल्या हस्तक्षेपामुळे पर्यावरणाचा र्‍हासच झाला आहे त्यामुळे त्याची भर काढणे किती गरजेचे होते आणि भविष्यासाठीही राहील! म्हणून आता तरी मानवाने पर्यावरणात उपलब्ध असलेल्या साधनसंपत्तीचा वापर करत सावधानता व सतर्कतेचा वसा हाती घेतला पाहिजे आणि पर्यावरणाला हानी न पोहोचवता भविष्याची तरतूद करत त्यात समतोल साधण्याची शपथ त्याने स्वतःहाशीच प्रामाणिक राहून घेतली पाहिजे…

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com