ऑनलाईन जॉब शोधतांना…!

jalgaon-digital
1 Min Read

आता ऑनलाईन जॉबही शोधता येतात. पण, हे करताना काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात घ्यायला हव्यात.

आजकाल जॉब शोधायचा असेल तर त्यासाठी इंटरनेटवरील वेबसाईटचा मार्ग खुला आहे. आपण ऑनलाईन पोस्ट केला तर कंपन्या आपल्यापर्यंत सहज पोहोचतात. ऑनलाईन जॉब शोधताना काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात घ्यायला हव्यात.

ऑनलाईन जॉब शोधताना सर्वात चांगल्या वेबसाईटची यादी बनवावी. त्या वेबसाईटवरच आपला रेज्युमे पोस्ट करावा. इंटरनेटवर अशा हजारो वेबसाईट आहेत ज्या ऑनलाईन जॉब देण्याचा दावा करतात. जॉब साईटसचा शोध घेताना आपली लोकेशन आणि झीप कोड आवर्जून लिहा. आपले ई-मेल रोज चेक करावेत. खासकरुन जॉब अलर्टवर नक्की लक्ष द्यावं. उशीर झाल्यामुळे हातात आलेला जॉब गमवावा लागू शकतो. ज्या जॉबसाठी आपण योग्य आहोत त्याच जॉबसाठी अप्लाय करावा. याचं कारण कंपन्या स्किल्स आणि अनुभवालाच प्राधान्य देतात.

जे त्वरीत मोठ्या फायद्याची ऑफर करतात अशा जॉबपासून सावध राहण्याची गरज आहे. त्याचबरोबर अशी ऑफर करताना त्या कंपन्या आपल्याकडून मोठ्या फीचीही मागणी करत असतील तर अशा जॉबपासूनही सतर्कता बाळगायला हवी. एखाद्या कंपनीने तुमच्या रेज्युमेकडे गांभीर्याने पाहून तुमची दखल घेतली आणि तिने तुम्हाला मेल केली तर लवकरात लवकर एक पत्र कंपनीला पाठवावं. त्यातून तुमचं जॉबविषयीचं गांभीर्य दिसून येईल.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *