Saturday, April 27, 2024
HomeUncategorizedचिंता आणि पांढरे केस

चिंता आणि पांढरे केस

एक ठराविक वय झाले की केस हळुहळु पांढरे होऊ लागतात, त्यात नवल काहीच नाही. परंतू अकाली केस पांढरे होण्याची अनेक कारणे आहेत. अमेरिकेच्या हावर्ड विद्‌यापीठातील प्राध्यापकांनी याविषयी संशोधन केले आहे.

या अभ्यासात असा दावा करण्यात आला आहे की केसाचा रंग ज्या पेशींवर अवलंबून असतो, त्या पेशी मानसिक ताण आणि दबाव यांच्यामुळे प्रभावित होतात, त्यांच्यावर वाईट प्रभाव पडल्याने केस पांढरे होतात.

- Advertisement -

थोडक्यात चिंता आणि मानसिक ताण हा केलाच्या पांढरेपणासाठी जबाबदार आहे. ह्या संशोधन अभ्यासातील मुख्य संशोधक सू यांच्या मते सतत तणावात राहिल्याने केसाला रंग देणारा मेलनिन नावाचा घटक पदार्थ निर्माण करणाऱ्या स्टेम सेल्स किंवा पेशी यांचा ऱ्हास होऊ लागतो. दीर्घ काळ तणावात राहिल्याने केसाला रंग प्रदान करणाऱ्या पेशी कायमस्वरूपी संपूनही जातात.

- Advertisment -

ताज्या बातम्या