उशिरापर्यंत काम… आरोग्यासाठी जोखमीचे
Featured

उशिरापर्यंत काम… आरोग्यासाठी जोखमीचे

Sarvmat Digital

हल्ली प्रत्येक जण उशिरापर्यंत काम करतो. परंतू एक नव्या संशोधनानुसार दीर्घकाळ सतत काम करत राहाणे आरोग्यासाठी नुकसानकारक असते.

हा दावा केला आहे कॅनडाच्या क्युबेक विद्यापीठाच्या संशोधकांच्या एका समूहाने. संशोधकांच्या मते, दीर्घकाळ काम करत राहाणाऱ्या लोकांमध्ये रक्तदाबाची जोखीम अधिक असते.

संशोधना दरम्यान क्युबेक मधील तीन सार्वजनिक कंपन्यांतील ३५०० कर्मचाऱ्यांचा अभ्यास केला गेला. त्यानुसार दीर्घ काळ सतत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांमध्ये उच्च रक्तदाबाने ग्रस्त असण्याची शक्यता अधिक असते. प्रत्येक आठवड्यात ४९ तास किंवा त्याही पेक्षा जास्त सतत काम करत राहिल्यास ही जोखीम ६६ टक्क्यांपर्यंत वाढते.

असा लोकांमध्ये मास्क हायपरटेन्शनची टक्केवारीही खूप अधिक असते. मास्क हायपरटेन्शन मध्ये सर्वसाधारणपणे रक्तदाब सामान्य पातळीत असतो परंतू तो अधून मधून वाढत राहातो.

Deshdoot
www.deshdoot.com